Urvashi Rautela ला पैसा येतो कुठून? करिअर फ्लॉप तरी कमवते कोट्यवधी रुपये

Urvashi Rautela कमवते इतके कोटी, कसं ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का  

Updated: Nov 18, 2022, 11:15 AM IST
Urvashi Rautela ला पैसा येतो कुठून? करिअर फ्लॉप तरी कमवते कोट्यवधी रुपये title=
a career flop bollywood actress urvashi rautela get earns crores of rupees nz

Urvashi Rautela Net Worth: सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.  बऱ्याच दिवसांपासून उर्वशी कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. उर्वशी ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ (urvashi rautela photo and video) शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अनेकवेळा तिच्या फॅशनमुळे उर्वशी चर्चेत असते. उर्वर्शी फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. (a career flop bollywood actress urvashi rautela get earns crores of rupees nz)

 

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सोबतच्या वादांमुळे खूप चर्चेत आहे. ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात सोशल मीडियावर सुरू झालेले युद्ध संपण्याचे नाव घेत नाही आहे. त्याच वेळी, ऋषभ पंतने अभिनेत्रीवर हेडलाइन्स मिळविण्यासाठी उलट विधान केल्याचा आरोप केला आहे.

उर्वशी रौतेलाने तिच्या चित्रपट कारकिर्दीत कोणताही विशेष चित्रपट केलेला नाही. तिचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. आतापर्यंत ती सनमारे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4, पागलपंती, सिंग साब द ग्रेट, भाग जॉनी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र त्याचा एकही चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही.

 

हे ही वाचा - 'श्रद्धाचा आत्मा परत यावा आणि त्याचे 70 तुकडे...'Ram Gopal Varma याचा ट्विटमधून संताप

 

उर्वशी रौतेलाचे सिनेमे फ्लॉप झाले असले तरी. पण ती अतिशय लक्झरी जीवन जगते. तिच्याकडे कोटींची संपत्ती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का उर्वशी रौतेलाचे करिअर फ्लॉप असूनही तिने कशी कमाई केली. 

उर्वशी रौतेलाचे चित्रपट लोकांना आवडत नसतील, पण तिची गाणी लोकांची मने जिंकतात. यामुळेच अनेक बड्या म्युझिक कंपन्या आयटम साँगमध्ये उर्वशी रौतेलाला घेतले जाते, त्या बदल्यात तिला करोडो रुपये मिळतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशी रौतेला एका आयटम साँगमध्ये काम करण्यासाठी 2 कोटी रुपये मानधन घेते.

 

उर्वशी खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. त्यामुळे मोठे ब्रँड त्यांना जाहिरातींसाठी साइन करतात. एका जाहिरातीसाठी ती 50 लाखांपर्यंत फी घेते. याशिवाय ती सोशल मीडियावरही भरपूर कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची अर्धी कमाई ब्रँड एंडोर्समेंट आणि मॉडेलिंगमधून येते.