परदेशातून आलं 16 किलोचं पार्सल, ऐश्वर्याला आला चौकशीचा फोन

लिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिची फॅन फॉलोईंगमध्ये कमी झालेली नाही

Updated: May 26, 2022, 05:44 PM IST
परदेशातून आलं 16 किलोचं पार्सल, ऐश्वर्याला आला चौकशीचा फोन title=

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिची फॅन फॉलोईंगमध्ये कमी झालेली नाही. त्याचबरोबर, आजच्या या रिपोर्टमध्ये तिच्याशी संबंधित एक मनोरंजक किस्सा आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.

ही गोष्ट 2006 सालची आहे जेव्हा मुंबईतील एका पोस्ट ऑफिसमध्ये ऐश्वर्यासाठी नेदरलँडमधून 16 किलो वजनाचं पार्सल आलं होतं. पार्सलवर ऐश्वर्या रायच्या घराचा पत्ता लिहिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कस्टमला संशयाच्या आधारे पार्सल उघडायचं होतं. त्यासाठी ऐश्वर्या राय तिथे हजर असणं बंधनकारक होतं. यासाठी कस्टमने ऐश्वर्याला पत्र पाठवून तिला बोलावलं. त्याचवेळी ऐश्वर्या राय जयपूरमध्ये तिच्या 'जोधा अकबर' चित्रपटाचं शूटिंग करत होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऐश्वर्या म्हणाली, पार्सल पाठवणाऱ्या व्यक्तीला ओळखत नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते पार्सल उघडल्यानंतर कस्टम विभागाने ऐश्वर्याला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं. त्यानंतर ऐश्वर्याच्या वकिलाने कस्टमला सांगितलं की, ऐश्वर्या पार्सल पाठवणाऱ्याला ओळखतही नाही. मात्र, जयपूरहून आल्यानंतर ऐश्वर्याने कस्टम विभागाला भेटून सांगितलं की, ती एका अवॉर्ड शोसाठी नेदरलँडला नक्कीच गेली होती. पण पार्सल पाठवणाऱ्या व्यक्तीला ती अजिबात ओळखत नव्हती.