मुंबई : आपल्या सुरुवातीच्या काळात अमिताभ बच्चन यांना एकामागून एक संकटांचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. नंतर आपल्या परिश्रमांच्या जोरावर ते महानायक बनले. 1969मध्ये रिलीज झालेल्या 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरच्या कारकिर्दीला सुरूवात केली. आज 11 मे रोजी अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' या चित्रपटाच्या रिलीजला 48 वर्षे पूर्ण झाली आहेत.
या चित्रपटात अमिताभ बच्चन व्यतिरिक्त प्राण, ओम प्रकाश आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा चित्रपट जर अमिताभ बच्चन यांच्या झोळीत पडला नसता तर, आज कदाचित त्यांना महानायक म्हणता आलं नसतं. या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली.
किस्सा, अमिताभ यांना 'जंजीर'मध्ये कास्ट करण्याचा
आज 'जंजीर' चित्रपटाला 48 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या चित्रपटाविषयीचे किस्से सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल. निर्माता-दिग्दर्शक प्रकाश मेहरा जेव्हा सलीम-जावेद यांनी लिहिलेल्या 'जंजीर' चित्रपटाच्या कथेसाठी अभिनेता शोधत होते तेव्हाची ही घटना आहे
या तीन दिग्गज कलाकारांनी दिला नकार
या चित्रपटासाठी सगळ्यात पहिले ते शम्मी कपूर यांच्याकडे पोहचले होते. अन्नू कपूर यांनी एकदा त्यांच्या शोमध्ये सांगितले होतं की, 'शम्मी कपूर यांना या चित्रपटाची कहाणी आवडली होती, मात्र त्यांनी या कारणासाठी हा सिनेमा नाकारला. कारण, या चित्रपटात डान्स न्हवता.. शम्मी, प्रकाश यांना म्हणाले, 'यांत डान्स वैगरे नाही आहे. त्यात मी काय करणार? थोडा डान्स वगैरे ठेवा'. यावर प्रकाश मेहरा म्हणाले- शम्मी जी, हा डान्स सिनेमा नाही.
आता प्रकाश ईथून निराश होवून अभिनेता देव आनंद यांच्याकडे पोहोचले. देव त्यांना म्हणाले की, 'तुमच्या चित्रपटाची थीम चांगली आहे, पण त्यात ना रोमान्य आहे ना डान्स. मी या चित्रपटात कसं काम करु?' देव आनंदनेही या चित्रपटात अभिनय करण्यास नकार दिला होता, मात्र प्रकाश मेहरासमोर त्यांनी एक अट ठेवली. ते म्हणाले, 'जर हा चित्रपट माझ्या बॅनरखाली तयार केला गेला तर मी नक्कीच यावर विचार करेन'.
मात्र, मेहरा यांनी त्यांना नकार दिला. ते म्हणाले की, 'आता मीच हा चित्रपट प्रोड्युस करणार'. यानंतर शम्मी आणि देव आनंद या दोघांचा नकार ऐकून प्रकाश मेहरा राज कुमार यांच्याकडे पोहोचले. राजकुमार यांनी आपल्या स्टाईल मध्येच हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यांनी प्रकाश यांना सांगितलं की, मी तुमचा हा चित्रपट करेन, पण माझी एक अट आहे. शूटिंगच्या वेळी तू दिग्दर्शक आहेस, पण मला तुझा चेहरा दाखवू नकोस.
प्राण यांनी अमिताभ बच्चन यांचं नाव सुचवलं होतं
प्रकाश मेहरा राजकुमार यांच्या घरातून देखील निराश होवून बाहेर पडले. आता तीन दिग्गज कलाकारांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. आता या चित्रपटात कोणाला कास्ट करावं हे प्रकाश मेहरा यांना समजत नव्हतं. त्यानंतर एका मिटींगमध्ये प्राण यांनी त्यांना एक नाव सुचवलं. हे नाव प्रसिद्ध अभिनेत्याचे नव्हतं तर एका कलाकाराचं होतं जो सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत होता.
प्राण यांनी प्रकाश यांना सांगितलं की, या मुलाच्या डोळ्यात मला एक चमक दिसते. प्राण यांच्या सल्ल्यावर प्रकाश यांनी या मुलाला स्क्रीप्ट टेस्टसाठी बोलावलं. त्याचे काही जुने चित्रपटही पाहिले. प्रकाश यांना त्यांच काम आवडलं आणि त्यांनी या मुलाला फायनल केलं आता हा मुलगा ईतर कोणी नव्हता तर महानायक अमिताभ बच्चन होते.
यूसुफ, इंडस्ट्रीमध्ये कोणीतरी तुम्हाला टक्कर देण्यासाठी आलं आहे…
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते ओम प्रकाश देखील एक भूमिका साकारत होते. एका सीन दरम्यान त्यांनी प्रकाश मेहरा यांना सांगितलं की, मी थोड्याच वेळात येतो. मला एक फोन करायचा आहे. त्यावेळी लँडलाईनदेखील नव्हते. तर ट्रंक कॉल होते. ओम प्रकाश यांनी चेन्नईला कॉल लावला, तिथे दिलीपकुमार त्यांच्या एका चित्रपटाचं शूटिंग करत होते.
ओम प्रकाश फोनवर दिलीप साहेबांना म्हणाले - युसूफ, कुणीतरी तुमच्याशी स्पर्धा करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आलं आहे. त्यांनी विचारलं कोण? यांवर ओम प्रकाश म्हणाले- अमिताभ बच्चन! यानंतर हा चित्रपट सुपर से उपर ठरला यानंतर अमिताभ बच्चन यांच्या यशाचा प्रवास सुरु झाला .