२०१८ मध्ये रिलीज होणार हे ८ बॉलिवूड सिक्वेल्स

२०१७ हे वर्ष आता संपत आलंय. बॉलिवूडसाठी हे वर्ष नेहमीप्रमाणे धमाकेदार ठरलं. पण या वर्षात सर्वात जास्त भाव खाऊन गेला तो ‘बाहुबली २’ हा सिनेमा. त्याव्यतिरीक्त बाकी सिनेमे ठिकठाक ठरले.

Updated: Dec 25, 2017, 09:00 PM IST
२०१८ मध्ये रिलीज होणार हे ८ बॉलिवूड सिक्वेल्स title=

मुंबई : २०१७ हे वर्ष आता संपत आलंय. बॉलिवूडसाठी हे वर्ष नेहमीप्रमाणे धमाकेदार ठरलं. पण या वर्षात सर्वात जास्त भाव खाऊन गेला तो ‘बाहुबली २’ हा सिनेमा. त्याव्यतिरीक्त बाकी सिनेमे ठिकठाक ठरले.

आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या २०१८ मध्ये येणा-या सिनेमांकडे. २०१८ हे वर्ष बॉलिवूडसाठी जरा वेगळं ठरणार आहे. कारण २०१८ मध्ये तब्बल ७ बॉलिवूड सिनेमांचे सिक्वेल रिलीज होणार आहेत. तसा बॉलिवूडचा सिक्वेलचा रेकॉर्ड फार काही चांगला नाही, पण हे सिनेमे नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतील असे दिसते आहे. 

१) टोटल धमाल - 

एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षित या सिनेमातून तब्बल १७ वर्षांनी एकत्र येणार आहेत. इद्र कुमार हे त्यांच्या ‘धमाल’ या सिनेमाचा सिक्वेल ‘टोटल धमाल’ घेऊन येत आहेत. या सिनेमात रितेश देशमुख, अर्शद वारसी आणि अजय देवगणही असणार आहे. 

२) २.० -

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या ब्लॉकबस्टर ‘रोबोट’ या सिनेमाचा सिक्वेल ‘२.०’ हा २०१८ मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

३) बागी २ -

साजिद नाडियाडवाला अभिनेता टायगर श्रॉफसोबत या सिनेमाच्या निमित्ताने तिस-या एकत्र आले आहे. याआधी टायगर आणि साजिद नाडियाडवाला यांनी ‘हिरोपंती’ आणि ‘बागी’ सिनेमासाठी एकत्र काम केलं होतं. 

४) १९२१ -

विक्रम भट हे त्यांच्या ‘१९२०’ या सिनेमाचा सिक्वेल ‘१९२१’ २०१८ मध्ये घेऊन येत आहेत. यात झरीन खान आणि करण कुंद्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

५) हेटस्टोरी ४ -

करण वाही हा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत असून ‘हेटस्टोरी’ सिनेमाचा हा चौथा सिक्वेल आहे. यातून इहाना ढिल्लोन ही अभिनेत्री पदार्पण करणार आहे. तसेच यात उर्वशी रौतेला हीचीही भूमिका असणार आहे.

६) रेस ३ -

‘रेस ३’ या सिनेमात अभिनेता सलमान खान हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रेमो डिसुझा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून यात जॅकलिन फर्नांडिस आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. 

७) बदलापूर २ -

वरून धवनच्या दमदार अभिनयाने गाजलेल्या ‘बदलापूर’चा सिक्वेल येत आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण बदला घेताना दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग अजून सुरू झालेलं नाहीये.