67th Filmfare Award 2022: रणवीर सिंगपासून 'त्या' मराठमोळ्या अभिनेत्रीपर्यंत, पाहा कोणाला मिळाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार

जाणून घ्या कोणत्या कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे. 

Updated: Sep 1, 2022, 09:37 AM IST
67th Filmfare Award 2022: रणवीर सिंगपासून 'त्या' मराठमोळ्या अभिनेत्रीपर्यंत, पाहा कोणाला मिळाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार title=

मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर. नुकतीच 67 (67th Filmfare Awards) व्या फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मुंबईत आयोजित कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांनी केले होते, तर कतरिना कैफ, करण जोहर, क्रिती सेनॉन, शहनाज गिल, मौनी रॉय, जॅकी श्रॉफ, दिया मिर्झा यांच्यासह अनेक सेलेब्स रेड कार्पेटवर दिसले. अशा परिस्थितीत यावेळी फिल्मफेअर पुरस्कार कोणाच्या वाट्याला आला ते जाणून घेऊया.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून 67 व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पुरस्काराची घोषणा सुरू झाली.
67 व्या फिल्मफेअरमध्ये रणवीर सिंगला ‘83’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर क्रिती सेनॉनला (Mimi) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) ‘शेरशाह’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. विकी कौशलला ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (क्रिटिक्स) पुरस्कार देण्यात आला आणि विद्या बालनला ‘शेरनी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) पुरस्कार मिळाला. 

पुरस्कार विजेत्यांची यादी पाहा 

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - शर्वरी वाघ (फिल्म ‘बंटी और बबली 2’)

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- एहान भट  

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) - सीमा पाहवा ‘रामप्रसाद की तेहरवी’ चित्रपट

सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले- शुभेंदु भट्टाचार्य आणि रितेश शाह ‘सरदार उधम’ चित्रपट

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सई ताम्हणकर ‘मिमी’ चित्रपटासाठी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- पंकज त्रिपाठी

सर्वोत्कृष्ट चित्रपट - शेरशाह

सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स)- सरदार उधम सिंग

सर्वोत्कृष्ट गीत- कौसर मुनीर ‘83’ मधील ‘लेहरा दो’ गाण्यासाठी

लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड- सुभाष घई  

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक०- बी प्राक (शेरशाहमधील ‘मन भरेया’ गाण्यासाठी)

वरुण धवन, सिद्धार्थ रॉय कपूर, तापसी पन्नू, अनुप जलोटा, शबाना आझमी, जावेद अख्तर, जॅकी श्रॉफ, संजीव कपूर, शर्वरी, नील नितीन मुकेश, अक्षय ओबेरॉय, रणवीर सिंग, रुपाली गांगुली, तुषार कपूर, एस. शेट्टी, कबीर बेदी, हरनाज संधू, मनीष मल्होत्रा, अनु मलिक आणि तनुश्री दत्ता यांच्यासह अनेक स्टार्सनी या अवॉर्ड शोला हजेरी लावली.