मुंबई : शुक्रवारी 65 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी फिल्ममेकर शेखर कपूर, आराधना प्रधान यांच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. 10 जणांच्या पॅनलने या सिनेमांच्या निवड केली आहे. या पुरस्कारात अनेक प्रादेशिक भाषांच्या सिनेमाचा समावेश आहे.
विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार , विनोद खन्ना यांना मिळाला मरणोत्तर पुरस्कार
श्रीदेवीला मिळाला मरणोत्तर पुरस्कार, मॉम सिनेमाला मिळाला पुरस्कार
बेस्ट मराठी सिनेमा 'कच्चा लिंबू'
बेस्ट मराठी सिनेमा 'कच्चा लिंबू'. प्रसाद ओकचा पहिला दिग्दर्शित सिनेमा असून रवी जाधवची या सिनेमांत भूमिका आहे. रवी जाधव आणि सोनाली कुलकर्णीने साकारली दाम्पत्याची भूमिका. मनमीत पेमने त्या मुलाची भूमिका साकारली. मंदार देवस्थळी निर्मित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.तसेच सचिन खेडेकर यांची देखील या सिनेमांत महत्वाची भूमिका आहे.
नागराज मंजुळेला पुरस्कार
'पावसाचा निबंध'ला ऑडिओग्राफीचा पुरस्कार मिळाला असून काही दिवसांपूर्वीच याचा टीझर रिलीज झाला होता. तसेच नागराज मंजुळेला बेस्ट डिरेक्शनचा देखील पुरस्कार मिळाला होता. पुन्हा एकदा नागराजने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे.
मराठी निर्मात्याला मिळाला पुरस्कार
मराठमोळा निर्माता अमित मसुरकरचा सिनेमा न्यूटनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.राजकुमार रावचा न्यूटन हा सिनेमा.
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या
स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) - म्होरक्या - यशराज कऱ्हाडे
एका सामान्य कुटुंबातील मुलाची इच्छाशक्ती, त्याची संघर्षपूर्ण वाटचाल, समाजातील माणुसकी व माणसांसाठी दिलेला लढा म्हणजे म्होरक्या द लिडर. सोलापूरत्या मातीतील कथानक असलेल्या या चित्रपटातून नेतृत्व कसे करावे असा संदेश देण्यात आला आहे. हा सिनेमाची निर्मिती कल्याण पडाल, लेखक व दिग्दर्शक अमेर देवकर आहे.
फीचर फिल्म पुरस्कार
नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) हा पुरस्कार ठप्पाला मिळाला असून निपुण धर्माधिकारीने दिग्दर्शन केलं आहे. निपुण धर्माधिकारीच्या बापजन्म या सिनेमाचं देखील कौतुक होतंय
सर्वोत्कृष्ट संकलन - मृत्युभोग
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) - मयत - सुयश शिंदे
या लघुपटाचा स्क्रिनप्ले सुयश शिंदेने लिहिला आहे. तसेच या सिनेमाला या अगोदर NFAI चा पुरस्कार देखील मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा- राजेंद्र जंगले
प्रमोशनल फिल्म 'चंदेरीनामा'
मराठी लघुपट मय्यतला राष्ट्रीय पुरस्कार... सुशय शिंदे दिग्दर्शित मय्यत सर्वोत्कृष्ठ लघुपट
सर्वोत्कृष्ठ अॅनिमेशन फिल्म 'फिश करी'
अक्षय कुमारला रूस्तमसाठी बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार
सर्वोत्कृष्ठ नॉन फिचर फिल्म 'वॉटर बेबी'