शाहरूखचे हे 5 सिनेमे कधी रिलीजच झाले नाही

कोणते आहेत हे सिनेमे

शाहरूखचे हे 5 सिनेमे कधी रिलीजच झाले नाही  title=

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान 2 नोव्हेंबर रोजी 53 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 26 वर्षांहून अधिक काळ शाहरूख खानला या सिनेसृष्टीत झाला आहे. आतापर्यंत शाहरूख 150 हून अधिक सिनेमे करणारा अभिनेता आहे. शाहरूखचे चाहते त्याचे प्रत्येक सिनेमे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही सिनेमे सांगणार आहोत जे कधी रिलीजच झाले नाही. त्या सिनेमांची नाव देखील तुम्हाला माहित नसतील.....

एक्स्ट्रीम सिटी (2011) 

शाहरूखच्या चाहत्यांना कायमच प्रश्न राहिला की, तो कधी हॉलिवूडकडे का वळला नाही. तर 2011 मध्ये शाहरूख हॉलिवूड सिनेमा एक्स्ट्रीम सिटीची शुटिंग करत होता. या सिनेमाचं दिग्दर्शन हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसे करत होता. या सिनेमात टायटॅनिक फेम लियोनार्डो डिकैप्रियो देखील होते. हा सिनेमा काही कारणास्तव थांबला आणि तो रिलीजच झाला नाही. 

रश्क (2001) 

रश्क या सिनेमाचं शुटिंग 2001 मध्ये झालं. सिनेमात शाहरूख खानबरोबरच महानायक अमिताभ बच्चन आणि जुही चावला देखील होते. सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं पण काही कारणास्तव हा सिनेमा रिलीज झाला नाही. 

अहमक (1991) 

यामध्ये शाहरूख खानचा अहमक हा सिनेमा देखील सहभागी होता. या सिनेमाचं दिग्दर्शन मणी कौल यांनी केलं होतं. या सिनेमात शाहरूख खानसोबत अयूब खान आणि मीता वशिष्ठ मुख्य कॅरेक्टर साकारत होते. हा सिनेमा 2015 मध्ये फिल्म फेस्टीवलमध्ये दाखवण्यात आला पण रिलीज मात्र झाला नाही. 

शिखर 1995 

परदेस या सिनेमाच्या लोकप्रियतेनंतर सुभाष घई यांनी शाहरूख खान आणि माधुरी दीक्षित यांकरता एक सिनेमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरूखला वाटतं होतं की या सिनेमात काही बदल असावा पण सुभाष घई यांना हे मान्य नव्हतं. त्यानंतर सुभाष यांनी सिनेमाचं नाव बदलून 'ताल' ठेवलं आणि त्या सिनेमात अक्षय खन्ना आणि ऐश्वर्याला घेतलं. हा सिनेमा नंतर सुपरहिट ठरला. 

किसी से दिल लगाके देखो (1996) 

या सिनेमाचं दिग्दर्शन कल्पतरू करणार होते. सिनेमाचं चित्रीकरण देखील झालं. मात्र हा सिनेमा मध्येच बंद झाला. या सिनेमाचं बंद होण्याचं कारण कळलं नाही पण शाहरूखसोबत या सिनेमात आयशा झुल्का आणि मधु लीड रोलमध्ये होत्या.