Happy Birthday : मानुषी छिल्लरच्या नितळ सौंदर्यामागे दडलेत 4 रहस्य

'या' 4 रहस्यांमुळे मानुषी छिल्लर दिसते प्रचंड सुंदर... तुम्ही देखील या चार गोष्टींचा वापर करु शकता  

Updated: May 14, 2022, 08:34 AM IST
Happy Birthday : मानुषी छिल्लरच्या नितळ सौंदर्यामागे दडलेत 4 रहस्य  title=

मुंबई : माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर पृथ्वीराज सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणाना दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मानुषीचं सौंदर्य पाहून सर्वचं स्तरातून अभिनेत्रीचं कौतुक होत आहे. राजकुमारीच्या मेकअपमध्ये मानुषी प्रचंड सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील नितळ सौंदर्यामागे अनेक रहस्य आहेत... 

मानुशीच्या सौंदर्याला पाहून प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहे, की ती इतकी सुंदर कशी दिसू शकते. रेडिएंट ग्लोसाठी मानुषी नक्की काय करते? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. जर तुम्ही देखील काही बेसिक रूटीन फॉलो कराल, तर तुमच्याही चेहऱ्यावर नितळ सौंदर्य दिसेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

माजी मिस वर्ल्ड मानुषीची त्वचा अगदी बाळाच्या त्वचेसारखी दिसते. ती टिकवण्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टी फॉलो करते. याशिवाय, तिच्याकडे त्वचेची काळजी घेण्यासाठी ती काही गोष्टी रोज करते.

एमडब्ल्यू नेटवर्कला दिलेल्या मुलाखीतीत मानुषीने तिच्या सौंदर्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. त्वचेला ग्लोइंग करण्यापूर्वी ती निरोगी ठेवण्याची गरज आहे. यासाठी ती 3 गोष्टींची जास्त काळजी घेते आणि त्या गोष्टी म्हणजे हायड्रेशन, न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज.

तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितकी त्वचा जास्त हायड्रेट होईल. अन्न देखील खूप महत्वाचे आहे कारण चुकीच्या आहारामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. तसंच ग्लोसाठी व्यायाम करायला हवा. यामुळे घाम येतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

एवढंच नाही तर मानुषीला मेकअप देखील फार आवडतो. मानुषीच्या बॅगमध्ये मस्कारा, लिप बाम आणि परफ्यूम कायम असतो. तिला डार्क लिपस्टिक आवडत नाही, त्यामुळे ती न्यूड लिपस्टीकचा वापर करते. 

सेलिब्रिटी असल्याने मानुषीला प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत तिला सर्व वेळ मेकअप सोबत ठेवावा लागतो, परंतु जेव्हा ती घरी परतते तेव्हा ती सर्वप्रथम मेकअप काढते.

मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर मानुषी आता सिनेमांमध्ये नशीब आजमावणार आहे. 'पृथ्वीराज' सिनेमात ती राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे.