या सवयींमुळे ऑफिसमध्ये मलीन होते तुमची प्रतिमा

...

Updated: Jun 12, 2018, 02:15 PM IST
या सवयींमुळे ऑफिसमध्ये मलीन होते तुमची प्रतिमा title=

मुंबई: आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असेल की, बरेच लोक ऑफिसमध्ये खूप मेहनत करतात. पण, तरीही ऑफिसमध्ये लोक त्यांना पसंत करत नाहीत. त्यांच्यासोबत कोणताही व्यवहार करणे शक्यतो टाळले जाते. ते काम तर प्रामाणिक करतात. पण, तरीही अशा लोकांवर बॉसची फारशी मर्जी बसत नाही. असे होण्याला बहुतांशवेळा तुमच्या सवयीही कारणीभूत ठरतात. म्हणूनच जाणून घ्या असा कोणत्या सवयी आहेत ज्या तुमच्या ऑफिसमधील प्रतिमा खराब करू शकतात...

कार्यालयीन शिस्त

... जर तुम्ही कार्यालयीन शीस्त पाळत नसाल तरीही तुमची प्रतिमा मलीन होऊ शकते.. उदा. वेळेवर येणे. दिलेले काम वेळेत पूर्ण न करणे आदी गोष्टी.

गॉसीप

बोलण्याच्या ओघात अनेक जण वाहवत जातात. त्यांना कोणत्या गोष्टी बोलायच्या आणि कोणत्या टाळायच्या हे ध्यानात येत नाही. अशा वेळी चुकून एकाध्या व्यक्तीची माहिती, वक्तव्ये इतर सहकाऱ्यांकडे पोहोचली जातात. याला गॉसिपिंग असेही म्हणतात. यातून तुमची प्रतिमा नकारात्मक बनते.

स्वच्छता

कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल पण अनेकदा ऑफिसमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टीही पाहिल्या जातात. जर तुमचा डेस्क नेहमी अस्ताव्यस्त असेल. खाल्लेले पदार्थ उघड्यावर पडत असतील. अनेकांना तर दुसऱ्याच्या डेस्कवर जाऊन पदार्थ खाण्याची सवय असते अशा वेळी योग्य ती साफसफाई करा. अन्यथा तुमची प्रतिमा मलीन होणे ठरलेले. 

अॅटीट्यूड

अनेकदा लोकांमध्ये आपली प्रतिमा बनण्यासाठी तुमचा अॅटीट्यूड महत्वाची भूमिका बजावतो. तेव्हा फार अॅटीट्यूड महत्त्वाचा नाही. बोलताना आपला टोनही काळजीपूर्वक वापरा. आपल्या वागण्या बोलण्यात विनम्रता हवी.

फोनचा वापर

तुम्ही जर ऑफिसच्या किंवा स्वत:च्या मोबाईल फोनवर मोठमोठ्याने बोलत असाल. तुमच्या फोनची रिंगटोनही अती मोठ्या आवाजात असेल तर, त्यामुंळे इतरांच्या कामात व्यत्यय येतो. अशा गोष्टी वारंवार घडल्या तरीही तुमची प्रतिमा मलीन होते.