10वी, 12वीच्या पुनर्परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

पाहा कधी होणार आहे पुनर्परीक्षा

Updated: Jun 11, 2018, 08:56 PM IST
10वी, 12वीच्या पुनर्परीक्षेचं वेळापत्रक जाहीर title=

मुंबई : दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दहावीची पुर्नपरीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान तर बारावीची पुनर्परीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तर तोंडी परीक्षा 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये या हेतूनं 2016 पासून मंडळानं ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणा-या परीक्षा जुलैमध्ये घेण्यास सुरुवात केली आहे.