मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेसाठी पुरवणी बंद करण्याच्या निर्णयाविरोधात एका विद्यार्थिनीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत.
मानसी भूषण असं या विद्यार्थिनीचे नाव असून ती गर्व्हमेंट लॉ कॉलेजमध्ये शिकतेय. विद्यापीठाच्या या निर्णयानुसार यापुढे परीक्षा काळात विद्यार्थ्यांना केवळ ४० पानी मुख्य उत्तर पत्रिका देण्यात येणार आहे. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यामुळेच हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवणार असल्याचे या विद्यार्थिनीने आपल्या याचिकेत म्हटलंय. या विद्यार्थिनीची ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतलीय.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १२ डिसेंबरला होणार आहे.