झारखंड : आता एक धक्कादायक बातमी. मैदानात खेळत असताना (school children play with bombs) झालेल्या बॉम्बस्फोटात तीन शाळकरी मुलं जखमी झाली. पण हा बॉम्बस्फोट नेमका कसा झाला, हे समजलं तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (school children play with bombs at Jharkhand)
शाळेजवळच्या मोकळ्या जागेत बॉल समजून काही शाळकरी मुलं चक्क बॉम्बशी खेळत (students were playing with bombs understanding the ball) होती आणि शेवटी व्हायचं तेच अघटित घडलं. एका मुलानं बॉल समजून चक्क बॉम्ब दगडावर आपटला आणि सगळा परिसर बॉम्बस्फोटानं हादरून गेला. या दुर्घटनेत विवेक तूरी, दिनेश हाडी आणि बादल हाडी ही तीन शाळकरी मुलं जखमी झाली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी विवेकची प्रकृती गंभीर आहे. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
मुलांचा बॉल निघाला बॉम्ब pic.twitter.com/GtjZHQx2xW
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 2, 2021
त्याचं झालं असं की, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी हे बॉम्ब जमिनीत प्लास्टिकच्या डब्यात लपवून ठेवले होते. मुलं तिथं खेळायला गेल्यानंतर त्यांना प्लास्टिकचा डबा दिसला. बॉम्ब समजून त्यातला बॉम्ब एकानं दगडावर आदळला आणि हा स्फोट झाला. झारखंडच्या धनबादमधील केंदुआडीह पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमिनीत लपवून ठेवलेले आणखी बॉम्ब शोधून काढलेत. त्यामुळे तुमच्या मुलांना सावध करा. मैदानात खेळताना बेवारस वस्तूंना मुलं हात लावणार नाहीत, याची काळजी घ्या.