एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 24, 2017, 04:19 PM IST
एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी title=

मुंबई : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

पात्र उमेदवारांकडून मागवले अर्ज

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेजमध्ये ट्रेड्समन / बेंच फिटर या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

१२ पदांसाठी होणार भरती

ट्रेड्समन / बेंच फिटर या पदांच्या १२ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.

पद:

ट्रेड्समन / बेंच फिटर 

एकूण जागा:

१२ जागा

शैक्षणिक योग्यता:

इच्छुक उमेदवाराने ट्रेड्समन / फिटर संदर्भातील आयटीआय कोर्स पूर्ण केलेला असावा. यासोबतच आरटीआय प्रमाणपत्रही अनिवार्य आहे. तसेच NCTVT केलेलं असावं. 

अनुभव:

इच्छुक उमेदवाराला संबंधित कामाच्या एका वर्षाचा अनुभव असावा. 

पगार: 

१५,००० रुपये प्रति महिना 

वयोमर्यादा:

१ नोव्हेंबर २०१७ रोजी उमेदवाराचं वय ४५ वर्षांपर्यंत असावं.

अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक:

२० डिसेंबर २०१७ 

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

एअर इंडिया व्यवस्थापक, नागपूर, प्लॉट नंबर १, सेक्टर ९, खापरी रेल्वे स्टेशन, मिहान, नागपूर - ४४११०८

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x