अभ्युदय बँकेत नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 27, 2017, 04:52 PM IST
अभ्युदय बँकेत नोकरीची संधी title=

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या बँकेतील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे. ही भरती प्रक्रिया व्यवस्थापक / सहायक व्यवस्थापक पदांसाठी होत आहे. 

इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.

पद :

- व्यवस्थापक

- सहायक व्यवस्थापक

एकूण पद :

- शाखा व्यवस्थापक: ९ जागा

- सहाय्यक व्यवस्थापक: ३ जागा

एक नजर टाकूयात कुठल्या ठिकाणी आणि किती पदांची आवश्यकता आहे

व्यवस्थापक पद : ९ जागा 

- नाशिक : २

- अहमादाबाद : २

- पुणे : ३

- उडपी : २

सहाय्यक व्यवस्थापक: ३ जागा

- नांदेड : १

- औरंगाबाद : २

शैक्षणिक योग्यता :

पदव्युत्तर पदवी/ पदवी

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवाराचं वय १ नोव्हेंबर २०१७ रोजी ३५ ते ५२ वर्षे असावं.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :

३० नोव्हेंबर २०१७

असा करावा अर्ज : 

इच्छुक उमेदवार बँकेच्या www.abhyudayabank.co.in या अधिकृत वेबसाईटवरुन आपला अर्ज सादर करु शकतात.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी बँकेच्या  www.abhyudayabank.co.in या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली जाहिरात पहावी.