लिडींग विकेट टेकर्सकडे सिलेक्टर्सची पाठ, 'या' भारतीय खेळाडुचे करिअर संपुष्टात?

Yuzvendra Chahal T20I Records: सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली नाही. यातच त्याच्या टी 20 खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 9, 2024, 02:53 PM IST
लिडींग विकेट टेकर्सकडे सिलेक्टर्सची पाठ, 'या' भारतीय खेळाडुचे करिअर संपुष्टात? title=

Yuzvendra Chahal T20I Records: रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी 20 सिरीज खेळणार आहे. याअंतर्गत 3 सामने खेळवले जातील. 11 जानेवारीपासून हे सामने सुरु होणार असून बऱ्याच दिवसांनी विराट कोहली खेळताना पाहणार आहोत. वर्ल्ड कपनंतर काही सिनीअर खेळाडूंनी विश्रांती घेतली आणि दुसऱ्या फळीतीली खेळाडुंना संधी देण्यात आली. दरम्यान असाही एक खेळाडू आहे, ज्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. निवड समितीचे या खेळाडुकडे लक्ष गेलेले दिसत नाही. त्यामुळे या खेळाडुचे करिअरच संपणार की काय? असा प्रश्न आता उपस्थित झालाय. 

हो. आपण बोलतोय भारताचा गोलंदाज युजवेंद्र चहल याच्याबद्दल. युजीला वारंवार बाजुला ठेवल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एका युजवेंद्र साइडलाईन झाला आहे. त्याला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली नाही. यातच त्याच्या टी 20 खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. युजवेंद्र चहल हा टी 20 फॉर्मेटमध्ये लिडींग विकेट टेकर आहे. त्यामुळे त्याला आताही संधी न मिळाल्यास त्याचे करिअरच संपणार का? असा प्रश्न त्याच्या फॅन्सकडून विचारला जातोय. 

युजवेंद्रच्या जागी कोणाला संधी?

अफगाणिस्तान सिरीजसाठी सिलेक्टर्सनी लेग स्पिनर म्हणून तरुण रवि बश्नोईला स्थान दिले आहे. तर कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरदेखील चांगला स्पिनर म्हणून पर्याय आहेत. चहलने 2023 ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरोधात टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यानंतर एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये त्याला स्थान मिळाले नव्हते. वर्ल्ड कपनंतर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी टुर्नांमेंटमध्येदेखील युजवेंद्र सहभागी नव्हता. त्यानंतर दक्षिण आफ्रीका दौऱ्यावरही त्याला जागा मिळाली नाही.त्यात टी 20 स्कॉडमधूनही तो बाहेर राहीला. 

टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट 

युजवेंद्र चहलने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 80 मॅचमध्ये 96 विकेट्स आहेत. तसेच एकावेळी तो 5 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. त्याने टी 20 फॉर्मेटमध्ये बेस्ट बॉलिंग फिगर 25 रन्स देऊन 6 विकेट्स घेतल्या. चहल 2022 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होता. असे असताना इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये त्याला खेळवण्यात आले नव्हते. 

1 वर्षापासून वनडे टीमबाहेर 

एक वर्षाचा काळ हा कोणत्याही खेळाडूसाठी खूप मोठा असतो. एका वर्षात अनेक मॅच खेळून त्याला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते. पण युजवेंद्र चहल याबाबतीत अनलकी ठरला आहे. युजवेंद्र भारतीय टीममधून एक वर्षापासून बाहेर आहे. त्याने 24 जानेवारी 2023 ला न्यूझिलंडविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला होता. यानंतर तो वनडे  टीममधून बाहेर आहे. या फॉर्मेटमध्ये त्याने 72 मॅच खेळताना 121 विकेट्स घेतले होते. तर दोनवेळा 5 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला होता. 33 वर्षाच्या या लेग स्पिनरला आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही. 

अफगानिस्तान टी20 सीरीजसाठी प्लेइंग इलेव्हन 

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार.