मुंबई: मयंक अग्रवालला कसोटी सामन्यात कधी संधी मिळणार? अशा प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवाल यांना संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या कसोटी करिअरची सुरुवात करणारा मयंक दुसरा भारतीय खेळाडू ठरला. मयंक याने त्याच्या पहिला सामन्यात चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. मेलबर्नमधील कसोटी सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये मयंक अग्रवाल याने १६१ चेंडूचा सामना करुन ७६ रन केले. ७६ रनाच्या या खेळीत ८ चौकार अणि १ षटकारचा समावेश आहे.
मयंक अग्रवाल त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक गाठू शकला नाही. परंतु, एका सामन्यात मयंक याने अनेक विक्रमांची नोंद केली. ऑस्ट्रेलियात पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा दातू फाडकर नंतर मयंक हा दुसरा फलंदाज ठरला. डिसेंबर १९४७ मध्ये सिडनी कसोटीत फाडकरने ५१ धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल हा पाचवा भारतीय सलामीवीर आहे. ज्याने देशाबाहेरील मैदानात अर्धशतक केले.
मेलबर्नच्या कसोटी सामन्यात मयंक जलदगती गोलदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांपुढे चांगल्या प्रकारे खेळताना दिसला. लियॉनच्या गोलंदाजीवर मयंक याने ५.४ च्या सरासरीने रन केले, तर फास्ट गोलंदाजासमोर त्यांची सरासरी २.८ होती. मयंक याला ऑस्ट्रेलियात खेळायला जास्त आवडते असे स्पष्ट होत आहे. २००९ मध्ये इंडिया अंडर १९ च्या पदार्पणातच ऑस्ट्रेलियाविरोधी सामन्यात १४२ चेंडूत १६० रन केले होते.