'मला तो खूप आवडतो', घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याच्या प्रेमात पडली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री

हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. सध्या हार्दिकच्या प्रेमात एक बॉलिवूड अभिनेत्री पडली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 30, 2024, 03:18 PM IST
'मला तो खूप आवडतो', घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याच्या प्रेमात पडली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री title=

Actress Loves Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा नताशा स्टॅनकोविकसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याचे नाव खूप चर्चेत आहे.  गायिका जास्मिन वालिया आणि हार्दिक पांड्या एकमेकांना डेट करत असल्याची बातमी अलीकडेच समोर आली होती. 

मात्र, आता हार्दिक पांड्याच्या प्रेमात एक बॉलिवूड अभिनेत्री पडली आहे. तिने आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री इशिता राज म्हणाली की, हार्दिक पांड्या मला खूप आवडतो. 

हार्दिक पांड्याबद्दल काय म्हणाली इशिता राज? 

नताशा स्टॅनकोविकसोबत लग्नाच्या 4 वर्षानंतर हार्दिक पांड्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर सोशल मीडियावर क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक बातम्या येत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री इशिता राजच्या नवीन वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. 

नुकतेच अभिनेत्री इशिता राजने फिल्मज्ञानला लेटेस्ट मुलाखत दिली आहे. यावेळी तिला हार्दिक पांड्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अभिनेत्री म्हणाली की, 'हार्दिक पांड्या हा एक महान क्रिकेट अष्टपैलू खेळाडू आहे. जेव्हा तो क्रीझवर असतो तेव्हा मला फलंदाजी करताना पाहण्यात खूप आनंद येतो. माझे त्याच्यावर प्रेम आहे. खरचं तो माझ्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे' असं अभिनेत्री इशिता म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या चित्रपटांमध्ये दिसली आहे इशिता

अभिनेत्री इशिता राज 'प्यार का पंचनामा' सीरिज आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात दिसली होती. अलीकडेच इशिताने नेटफ्लिक्सच्या 'वाइल्ड वाइल्ड पंजाब' या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

हार्दिकचे नाव जस्मिन वालियासोबत जोडले गेले होते

काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचे नाव हे गायिका जस्मिन वालियासोबत जोडले गेले होते. या दोघांचे व्हेकेशनचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतकेच नाही तर हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया या दोघांनी देखील एकमेकांच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली होती. मात्र, दोघांनी देखील डेटिंगची पुष्टी केलेली नाही.