Kantara : कांतारा चित्रपट का ठरलाय इतका हिट? एका महिन्यात कमावले तब्बल 250 कोटी

अनेक बॉलीवूड सिनमे सिनेगृहात आलेत पण हे सिनमे बॉक्स ऑफिसवर तितकी कमाई करु शकले नाहीत. कधी बॉयकॉटचा ट्रेंड तर कधी एखाद्या सिनेमाचा रिमेक तर कधी दमदार कथानक नसल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळते. पण या सिनेमाने मात्र बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला आहे.

Updated: Oct 30, 2022, 05:14 PM IST
Kantara : कांतारा चित्रपट का ठरलाय इतका हिट? एका महिन्यात कमावले तब्बल 250 कोटी title=
Pic Source - Movie Poster

प्रतिक्षा बनसोडे, झी मीडिया, मुंबई : खरंतर दिवाळी म्हटले की खान मंडळीचा सिनेमा आणि कोट्यावधीचा गल्ला असेच समीकरण गेले दशकभर दिसले. परंतु यंदा या गोष्टीला मोडीत काढत दाक्षिणात्य सिनेमा 'कांतारा'ने (kantara) शानदार कामगिरी सुरु ठेवली आहे. कन्नड भाषेतील या सिनेमाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. सिनेमा गेल्या महिन्यात 30 सप्टेंबरला प्रथम कन्नड भाषेतून रिलीज झाला. सिनेमाची कथा, दिग्दर्शन, गाणी आणि स्टारकास्ट या गोष्टींनी सिनेमा लोकप्रिय झाला. यानंतर या सिनेमाचा तामिळ, तेलगू, मल्ल्याळम आणि हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला. साधारण 16 करोड इतकेच बजेट असणारा या सिनेमाने गेल्या एक महिन्यात 257 करोडचा गल्ला कमावला आहे. या सिनेमाचे चित्रिकरण कर्नाटकात करण्यात आले आहे. सिनेमात अभिनेत्याचा रोल करणारा रिषभ शेट्टी(Rishabh Shetty) यानेच सिनेमाची कथा लिहली आहे. त्यामुळे कथा मोठ्या पडद्यावर सादर करताना ती उत्तमरित्या रिषभ यांनी प्रेक्षकांसमोर मांडली आहे.  (kanatara movie review why movie has become such a hitread full blog pratiksha bansode) 

सिनेमाचे दिग्दर्शन, कथा आणि सिनेमातील मुख्य भुमिका हे सारे रोल ऋषभ शेट्टी(Rishab Shetty) यांनी केले आहे. सिनेमाची कथानक तीन पिढ्यांचे दाखवले आहे. पण ते इतक्या सहजरीत्या एकमेकांना गुंफून ठेवते की तुम्हाला सिनेमात पुढे काय याची उत्सुकता लागून राहील. पर्यावरण आणि माणूस यांचे असलेले जीवनचक्र साकारण्यात आले. सिनेमा पाहताना तुम्ही काही गोष्टीचे लॉजिक न लावलेलेच बरे असेल, कारण हा सिनेमा तुम्ही एखाद्या कथे प्रमाणे पहिलात तर जास्त एन्जॉय कराल. 

तुम्हाला सिनेमात सस्पेन्स , कॉमेडी, अ‍ॅक्शन, रोमान्स, हॉरर अशा सार्‍या गोष्टी सापडतील. त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही. पर्यावरण आणि त्यावर अवलंबून असलेले मानवी जीवन लेखकाने मस्त साकारले आहे. तसेच सिनेमातून सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे. सिनेमाचा वेळ साधारण 2 तास 30 मिनिटांचा आहे. पण शेवटची पंधरा ते दहा मिनिटांतील क्लायमॅक्स आणि अ‍ॅक्शन तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडेल. सिनेमातील गाणी आणि बॅकग्राऊंड म्युझिक अतिशय सुदंररित्या तयार करण्यात आले आहेत. 

सिनेमा का पाहावा?

 कोरोना निर्बंध शिथील केल्यानंतर गेल्या सहा महिन्यात अनेक बॉलीवूड सिनमे सिनेगृहात आलेत. पण हे सिनमे बॉक्स ऑफिसवर तितकी कमाई करु शकले नाहीत. कधी बॉयकॉटचा ट्रेंड तर कधी एखाद्या सिनेमाचा रिमेक तर कधी दमदार कथानक नसल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळते. पण याच 6 महिन्यात दाक्षिणात्य सिनेमे मात्र हिंदीत डब होवून फक्त आणि फक्त कथानकावर चालताना दिसतायेत. 

सिनेमाचे टीझर ते सिनेमा मोठ्या पडद्यावर साकरणे या गोष्टी दाक्षिणात्य सिनेमात उत्तमरित्या केले जाते. प्रेक्षकांना आता नवे कथानक जास्त आवडू लागले, कारण आता सिनेमातील तिच तिच स्टोरी आणि रिमेक प्रेक्षकांना आवडत नसल्याचा कल दिसतोय. या सिनेमाची प्रशंसा रजनीकांत, धनुष, अक्षय कुमार, कंगणा रणावत अश्या अनेक सिने अभिनेत्यांनी या सिनेमाचे आणि टीमचे कौतुक केले आहे. हा सिनेमा तुम्हाला वेगळे कथानक आणि पैसै वसूल मनोरंजन देईल त्यामुळे नक्की हा सिनेमा पाहा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x