सफाई कामगारांच्या व्यथा कधी संपणार? अमृतमहोत्सवी वर्षातही समाजाला लाजवेल अशी अवस्था

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही सफाई कामगारांची अवस्था गुलामी काम करणाऱ्या व्यक्तींसारखीच आहे.

Updated: Oct 19, 2022, 11:13 PM IST
सफाई कामगारांच्या व्यथा कधी संपणार? अमृतमहोत्सवी वर्षातही समाजाला लाजवेल अशी अवस्था title=

पोपट पिटेकर, झी मीडिया,मुंबई : बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचा असा विश्वास होता (Babasaheb Dr. Bhimrao Ambedkar) की भारतात कोणीही आपल्या कामामुळे सफाई कामगार (cleaners) नाही, तर आपल्या जन्मामुळे सफाई कामगार आहे. हाताने विष्ठा काढणे किंवा विष्ठेने भरलेली टोपली उचलणे हे अत्याचाराचे लक्षण आहे. तसं पाहिलं तर जातिव्यवस्थेच्या (caste system) भक्कम पकडीने जखडलेल्या या लाचार लोकांचा आजही समाजात सर्वाधिक तिरस्कार केला जातो.

त्यामुळेच त्यांच्या निर्दयी मृत्यूवर (Merciless death) सुसंस्कृत समाजात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्ती केली जात नाही, त्यांच्या स्मरणार्थ कधी मेणबत्ती पटवली किंवा मोर्चाही काढला जात नाही किंवा राष्ट्रीय चर्चेचा विषय देखील त्याचा मृत्यू बनत नाही. कदाचित या घटनांमुळे जातीय श्रेष्ठत्वाच्या भावनेने वर्गाच्या संवेदनाही हादरल्या आहेत. आज संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव (Amritotsava of freedom)साजरा करत आहे. यानिमित्ताने देशातील हाताने सफाईची प्रथा (Manual cleaning practice) पूर्णपणे संपुष्टात आणण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर सफाई कर्मचा-यांचीही (cleaners) काळजी घेतली पाहिजे.

हाताने सफाई
 
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही गरिबांना हाताने सफाई करावी लागत आहे. खेदाची गोष्ट ही आहे की स्वच्छता अभियानाच्या (Cleanliness campaign) सर्व दाव्यांमध्ये समाजाला लाजवेल अशा घटना आपल्या शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे.

सफाई कामगार आणि तांत्रिक सुविधा

अनेकदा तांत्रिक सुविधा (Technical facilities) असतानाही गटार आणि सेप्टिक टाक्या (Sewer septic tanks) साफ करण्यासाठी यंत्रसामग्री वापरली जात नाही. देशात कोरड्या शौचालयांची संख्या 26 लाख आहे. सुमारे 14 लाख शौचालयांचा कचरा (Toilet waste) उघड्यावर टाकला जातो, त्यात आठ लाखांहून अधिक शौचालयांचे सांडपाणी हाताने स्वच्छ केले जाते. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग दूर संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत गटार साफ करताना सुमारे 350 लोकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, मृतांचा आकडा जास्त असल्याचे स्वच्छता चळवळीशी संबंधित लोकांचे मत आहे. कोरडी शौचालये स्वच्छ करण्याची प्रक्रियाही किचकट असते.

दर पाचव्या दिवशी मृत्यू

देशातील गटारांच्या टाक्यांची साफसफाई करताना सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे (Deaths of sanitation workers) प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीत. अलीकडेच दिल्ली, नोएडा आणि फरिदाबाद येथे अनेक ठिकाणी गटार आणि सेप्टिक टाक्यांची (Sewers septic tanks) मॅन्युअल साफसफाई करताना अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. अशा घटना देशाच्या विविध भागातून समोर येत आहेत.  शहरांतील सर्व रहिवासी-कार्यालय संकुलातील गटारे आणि सेप्टिक टाक्या साफ करण्यासाठी, लहान-मोठे, अकुशल सफाई कामगारांना 400 ते 500 रुपयांच्या लालसेने कंत्राटदारांकडून (contractor) 10-15 मीटर खोल टाक्यांमध्ये बेल्ट, मास्क, टॉर्च (Belt, mask, torch) आणि इतर बचाव उपकरणे देण्याचे आमिष दाखवले जाते. रोजगाराअभावी, स्वच्छता कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून त्या गॅस चेंबरमध्ये (Gas chamber) उतरतात. जिथे अनेकदा अमोनिया, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड इत्यादी विषारी वायूंमुळे त्यांचा मृत्यू होतो. सरकारी आकडेवारीनुसार दर पाचव्या दिवशी एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू (Death of sanitation worker) होत आहे.

कर्मचा-याचा मृत्यू आणि गुन्हे

सफाई कामगारांच्या मृत्यूनंतर मृतांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून संबंधित संस्था अँड विविध ठिकाणी आयपीसीच्या कलम 304(2) अन्वये अधिका-यांवर गुन्हे दाखल केलं जातात. परंतु त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगला प्रतिबंध (Prevention of manual scavenging) करणाऱ्या कायद्याचे कोणी उल्लंघन केल्यास, प्रत्येक उल्लंघनासाठी संबंधित व्यक्तीला एक वर्षाचा तुरुंगवास (One year imprisonment) आणि दंडाची शिक्षा होईल. तसेच कोणत्याही कंपनीने त्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावरही कारवाईची तरतूद आहे.

सफाई करताना येणारे समस्या

आधुनिक टॉयलेटमध्ये फ्लश सिस्टम (Flush system in toilet) असतात. जे सहसा सीवर लाईन किंवा मोठ्या नाल्यांना जोडलेले असतात. याउलट, कोरड्या शौचालयात, सांडपाण्याची विल्हेवाट स्वतःच केली जात नाही, तर हातानेच करावी लागते. सफाई कामगार जेव्हा सीवर लाइन किंवा सेप्टिक टाकी (Septic tank) साफ करण्यासाठी खाली येतात तेव्हा त्यांना विषारी वायूंपासून जळजळ, श्वास लागणे, उलट्या, डोकेदुखी, संसर्ग आणि हृदयविकारापर्यंतच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

सुविधा देणं गरजेचं

स्वच्छता अभियान हे केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक असले तरी कामगारांच्या वेतनमध्ये वाढ (workers salery)आणि त्यांना लागणारे सुविधा पुरवणं गरजेचं आहे. नाही तर लेखक नरेंद्र वाल्मीकि यांनी सफाई कामगार यांच्यावर केलेलं भाषं खरं ठरताना दिसेल.

'सोचिए जरा जिस गंदगी को,
देख के इंसान कतराता है।
उसी को अपने हाथों से,
सफाई कामगार उठाता है।

कुछ पैसों के लिए यह अपनी,
जान की बाजी लगाता है।
जीवित उतरता है सीवर में,
‘शव’ रूप में बाहर आता है।

त्यांना सुविधा मिळालं नाही  तर कवितेच्या ओळीनुसार अशीच परिस्थिती वारंवार सुरुच राहील.