दयाशंकर मिश्र : आपण पालनपोषण करतो. आपलं पालनपोषण ज्या प्रमाणे झालेलं असतं त्या आधारावर, सर्वच पालक पाल्यांचं पालनपोषण करतात. ज्या वातावरणात आम्ही वाढलो, आम्हाला आठवतं, जे मी समजू शकतो, या आधारावर! याबद्दल आता जर तुम्ही भारतातील पालकांना विचारलं, तसेच त्यांच्यात एक सर्व्हे केला, आणि त्यांना विचारलं की मुलांमध्ये जाणवत असलेली एखादी अडचण सांगा, तर निश्चित पुढे जे उत्तर समोर येईल, ते नेमकं काहीसं असं असू शकतं...
मुलं अभ्यास करत नाहीत, शाळेत प्रगती खराब होत चालली आहे. आईवडील जे सांगतात, ते मुलं गंभीरतेने ऐकत नाहीत. स्वत:च्या कामाविषयी देखील ते गंभीर नाहीत. आपण मुलांमध्ये हा गुण जास्त पाहू इच्छितो, तो म्हणजे, गंभीरता.
आम्हाला हसणारे, खेळणारे, उड्या मारणारे, मज्जा, गंमत करणारी मुलं आवडतात, पण दुसऱ्यांची. आपल्या घरातील मुलांकडून तर आपण हीच अपेक्षा ठेवतो, जेवढं शक्य असेल, त्यांनी गंभीर रहावं. कारण अशाच वातावरणात आपल्यालाही वाढवलं गेलं.
हे जरा आठवून पाहा, लहानपणी शाळेत त्या मुलाला चांगला मुलगा मानलं जात नव्हतं, जेव्हा त्याच्यात चंचलता, बालसुलभ विनोद दिसत होते. शिक्षकांची वाह वा त्यांना मिळत होती, जे नेहमी गंभीर जर्सी घालून, चेहरा पडलेले शाळेत दिसत होते. अशा लोकांना इंग्रजीत डेड सीरिअस ( Dead Serious) म्हणतात. ज्यांच्यासाठीहे वापरलं जातं, ते त्यांच्यासाठी सन्मानजनक वाटत असतं. पण हे त्यांच्यासाठी घातक आहे.
आम्ही विसरतो की, ज्या शब्दासोबत डेड (Dead) शब्द येतो, त्याच्या अर्थात जीवन शक्य नाहीय, असं सीरिअस किंवा गंभीर होणं, काहीही कामाचं नाही.
दार्शनिक बर्टेंड रसेल म्हणतात, जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही एखादं महत्वाचं काम करताय, तर तुमची सुटी घेण्याची वेळ आली आहे. रसेल म्हणतात, या भावनेनेच आपण स्वत:ला डेड सीरिअस होण्यापासून वाचवू शकतो. हाच आपल्याला जिवंत ठेवण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे.
आपल्या भारतीयांना तर यावेळी असं वाटतं, आपण डेड सीरिअस होण्याच्या मार्गाकडे जात आहोत. आपल्याकडून सर्वसामान्य गोष्टींना, हसत हसत करण्याची शक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आम्ही गंभीरताला एक संस्कार म्हणून स्वीकारलंच नाही. पण आपण एवढं महत्व गंभीरपणाला दिलं की, गंभीर असणं म्हणजे सर्वकाही असं मानलं.
भारत एक क्रिकेट प्रेमी देश असल्याने तुम्ही प्रसिद्ध क्रिकेटर गौतम गंभीरचं नाव ऐकलं असेल, गंभीरने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्याला त्यांच्याबाबतीत आधीपासून खूप काही माहित आहे. पण गंभीर यांनी पालनपोषणासंबंधी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या खूप मूळ समस्या आहेत.
गंभीर म्हणतो, तो मैदानात कधीच हसत नव्हता, तो हसूच शकत नव्हता, कारण त्याला कोणतीही गोष्ट सहज मिळालेली नव्हती प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. किती गंमतीशीर गोष्ट आहे.
एखाद्या खेळात तुम्हाला सहजच विजय मिळू शकतो. क्रिकेटमध्ये एवढी स्पर्धा आहे की, तुमच्यात काही ना काही विशेष नक्कीच असलं पाहिजे. जर काही तरी मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली असेल, तर त्यात तुम्ही असामान्य कसे असू शकता.
आपल्याजवळ जे तथ्य आहेत, त्यानुसार आम्हाला माहितीय की, सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यापेक्षा कितीतरी कठीण समुद्र पार करून गंभीर स्टेडीअममध्ये पोहोचला.
जीवनात सहज कुठे काय मिळतं. शिवाय ज्यांना वारसात धन-संपत्ती मिळाली आहे. सर्वांना सर्व काही मिळवणं शक्य होवू शकतं. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, जगात असं करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.
गौतम गंभीर यांच्या या गंभीर दृष्टीकोनावर फिरकी घेताना शाहरूख खान म्हणाला, 'आता गंभीर थोडंस जास्त हसू शकतो, या गोष्टी तेव्हा होत आहेत, जेव्हा गंभीर रिटायर्ड होत आहेत. चाळीशीच्या आसपास असेल, क्रिकेटच्या मैदानावरचे त्यांचे नखरे, संताप या कारणांमुळे ते चर्चेत राहिले. तो कसा आपल्या चुकीच्या गोष्टींना संघर्षाशी जोडत आहेत'.
ही फक्त गौतम गंभीरची नाही, तर अनेक भारतीयांची अडचण आहे. ज्यांनी काही मिळवणे, एवढं महत्वाचं बनवून ठेवलं की, ते आपला खरा स्वभाव सोडून गंभीर, कठोर होत गेले, यात प्रेम, उत्साह, आत्मियताचा रंग उडून गेला.
आम्ही मुलांना नेहमीच गंभीर बनवण्यासाठी बैचेन आहोत. आपण मुलांना प्रेम करणे, आनंदी ठेवणे, शिकवणे यांच्या जागी, त्यांना त्यांच्या जगातही रमू द्या, या उलट त्यांना आपल्यासारखं गंभीर बनवण्यात लोक लागले आहेत.
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)
पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4,
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)