Heeramandi : संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Netflix रिलीज झाली. त्यानंतर सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइरालासह शेखर सुमन यांच्या अभिनयाचं कौतुक होतंय. या वेब सीरिजमध्ये जुल्फिकारची भूमिका साकारणाऱ्या शेखर सुमन याची चर्चा होतेय. अनेक ठिकाणी त्याच्या मुलाखती होत आहेत. या सिरीजमध्ये संजय लीला भन्साळी यांनी पाकिस्तानमधील तवायफची व्यथा यातून मांडली आहे. या सिरीजबद्दल बोलताना शेखर सुमन यांनी तवायफ आणि देहविक्री करणाऱ्या महिलांमधील फरक सांगितला.
शेखर म्हणला की, 'आपण देहविक्री करणाऱ्या महिला आणि तवायफ यांना एकाच श्रेणीत पाहत असतो. हे अतिशय चुकीच आहे. समाजाने तवायफकडे नेहमीच चुकीच्या दृष्टीकोनातून पाहिलंय. या तवायफला समाजाने देह विक्री करणाऱ्या महिलांच्या रांगेत उभं केलंय. तवायफ म्हणजे गणिका आणि देह विक्री करणाऱ्या महिलांमध्ये फरक असतो. '
शेखर सुमन यांनी रेडिओ सिटीशी बोलताना यामधील फरक सांगितला. अभिनेता म्हणाला की, 'समाजानेच या महिलांना या अंधार नगरीत ढकलंय. कोणतीही महिला स्वतःच्या इच्छेने गणिका किंवा तवायफ बनत नाही. या सिरीजमध्येही ते प्रकर्षाने दाखविण्यात आलंय. परिस्थिती महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडते. या सर्व गोष्टी असूनही समाजासाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. ज्या समाजातून पुरुष येतात. ज्याप्रकारची भूक पुरुषांमध्ये दिसते त्यामुळे हा समाज आजही अस्तित्वात आहे.'
शेखर सुमन यांनी याआधी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'शाळा पूर्ण केल्यानंतर तरुणांना 'हिरामंडी' मध्ये पाठवलं जायचं. जेणेकरून त्यांना शिष्टाचार आणि शिस्त लगावी. तिथे हे तरुण प्रेम, कविता, संगीत आणि नृत्य शिकायचे. या हिरामंडीतून तरुण, नवाब तवायफकडून खूप काही शिकायचे. त्या काळात नवाबाच्या अस्तित्वासाठी हिरामंडीचं मोठं योगदान आहे. ही एक मोठी संस्था होती. पण आपण तवायफला एका वेगळ्यातच नजरेतून पाहतो. तवायफ किंवा गणिका असं हे काही गैर नाही. त्यांचे स्वातंत्र्यातील योगदान हिरामंडीतही दाखवण्यात आलंय.'
लाहोरमधील रेड लाईट एरिया असलेल्या 'हिरामंडी'वर आधारित ही वेब सीरिजची सर्वत्र चर्चा होते आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या मालिकेत मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा आणि संजीदा शेख यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून त्यांची वाहवाह होतेय. ही सीरीज भारतातच नाही तर परदेशातही खूप नावाजली जातेय.