वॉशिंग्टन : झिका व्हायरसने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला. जगभरातील विकसीत देशही या व्हायरसने टरकून गेले. मात्र, या व्हायरसचा एक चांगला गुणही पुढे आल्याचे समजते.
अनेकांच्या मृत्यूचे कारण बनलेला झिका व्हायरस ब्रेन कॅन्सरवर इलाज करू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. यावर अद्याप संशोधन सुरूच आहे. पण, संशोधकांनी म्हटले आहे की, ब्रेन कॅन्सरचे कारण ठरत असलेला ग्लियोब्लास्टोमासाठी हा एक प्रभावी उपाय असू शकतो.
अमेरिकेतील वॉशिग्टन युनिवर्सिटीचे प्रोफेसर मायकेल एस डायमंड यांनी म्हटले आहे की, आम्ही पाहिले आहे की, झिका व्हायरस हा ग्लियोब्लास्टोमाच्या पेशींना मारू शकतो. दरम्यान, हे संशोधन अद्याप अंतिमत: पूर्ण झाले नाही. यावर अधिक संशोधन आजूनही सुरूच आहे.