ज्याला श्रद्धांजली वाहिली तोच शत्रू पुतिन यांच्या जिवावर उठणार, रशियात रचला जातोय मृत्यूचा कट

Yevgeny Prigozhin is Alive? रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरु असतानाच तिथं आता रशियामध्ये वेगळीच खेळी खेळली सुरु असल्याचं वृत्त जागतिक स्तरावर लक्ष वेधत आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 30, 2023, 08:40 AM IST
ज्याला श्रद्धांजली वाहिली तोच शत्रू पुतिन यांच्या जिवावर उठणार, रशियात रचला जातोय मृत्यूचा कट  title=
Yevgeny Prigozhin is Alive and preparing revenge against vladimir putin

Yevgeny Prigozhin is Alive? रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांनी त्यांच्या राजकीय डावपेचांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. पण, आता मात्र याच पुतिन यांच्याविरोधात कट रचणारी एक फळी सक्रिय झाली आहे. किंबहुना संपूर्ण जगासाठी पुतिन यांच्या शत्रूचा डाव संपला असला अर्थात त्याचा मृत्यू झाला असला तरीही Yevgeny Prigozhin अद्यापही हयात असून तो महासत्ता रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना संपवण्याचा कट आखत असल्याचं म्हटलं जात आहे. 

वॅगनर गटाचे प्रमुख येवेज्ञनी प्रिगोझिन यांचा अपघाती मृत्यू झाला असून रशियानंही या वृत्ताला दुजोरा दिला. मंगळवारीच रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे प्रिगोझिन यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती संपूर्ण जगासमोर आली. आता मात्र त्यांच्या निधनाचे सर्व पुरावे असचानाही ते हयात असण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रशियातूनच असे दावे करण्यात येत आहेत. यामागं प्रिगोझिनचा भूतकाळ आणि गतकाळातील काही घटनांचा संदर्भ दिला जात आहे. 

'डेली मेल'च्या माहितीनुसार रशियातील डॉ. वालेरी सोलोवी या राजकीय विश्लेषक यांनी केलेल्या दाव्यानुसार प्रिगोझिन यांचा मृत्यू अद्यापही झालेला नाही. 23 ऑगस्ट रोजी झालेल्या विमान अपघातामध्ये प्रिगोझिन नव्हे, त्यांच्या 'Body Double'चा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. राहिला मुद्दा प्रिगोझिन कुठे आहेत याबद्दलचा तर, सध्या ते एका अज्ञात देशात असून, तिथं ते निश्चिंत संचार करत असल्याचा दावा केला जात आहे. 

प्रिगोझिन कायमच 'Body Double'ची मदत घ्यायचे 

'इंस्टीट्यूट ऑफ इंटरनेशनल रिलेशन' (MGIMO)चे माजी प्राध्यापक असणाऱ्या डॉक्टर सोलोवी यांनी प्रिगोझिनसंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी प्रिगोझिन यांच्यासंदर्भात केलेल्या दाव्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्या. प्रिगोझिन कायमच त्यांच्या जीवाला असणारा धोका पाहता सोबत बॉडी डबल अर्थात त्यांच्यासारखी देहयष्टी आणि चेहरा असणाऱ्या व्यक्तीचा इतरांना हुलकावणी देण्यासाठी वापर करायचे. सध्या ते पुतिन यांच्याविरोधा सूड उगवण्यासाठीचा कट आखत असल्याचा खळबळजनक खुलासाही सध्या करण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : मंगळ ग्रहावर पाठवणार 10 लाख माणसं; Elon Musk यांचे भयानक मिशन

 

का केला जातोय प्रिगोझिन हयात असण्याचा दावा? 

डॉ सोलोवी यांच्या मते प्रिगोझिन यांनी ज्या विमानानं प्रवास करणं अपेक्षित होतं त्याच विमानावर रशियाच्या संरक्षण यंत्रणांद्वारे निशाणा साधण्यात आला. एक म्हणजे विमान हवेत असताना कोणताही स्फोट झाला नाही, तर त्यावर बाहेरून हल्ला करण्यात आला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याच सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली होती. किंबगुना पुतिन यांनाही विमानात प्रिगोझिन नसल्याची कल्पना नव्हती. पण, प्रिगोझिन यांनी त्याच्या जीवाच्या बदल्यात साथीदारांचे प्राण पणाला लावले आणि हा प्रस्ताव स्वीकारला. आता मात्र ते पुन्हा एकदा पुतिन यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.