वॉशिंग्टन : दोन्ही कोरियन देशांमध्ये सौहार्द निर्माण होण्याची अपेक्षा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरियन देशांमधल्या संबंधावर लक्ष केंद्रित केलंय. दोन्ही कोरियन देशांनी म्हणजेच उत्तर आणि दक्षिण कोरियाने आपसातील संबंध सुधारावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.
उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये संबंध सुधारण्यासाठी बोलणी आयोजित केली आहेत. त्यातच दक्षिण कोरियामध्ये हिवाळी ऑलिंपिक येऊ घातलय. त्यामुळेच या दोन्ही देशांमधले संबंध अधिक वृद्धींगत झालेले बघायला आपल्याला आवडील असं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलंय.
मी द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे ईन यांच्याशी बोललो. उ. कोरियाच्या बाबतीत मी घेललेल्या कडक भूमिकेबद्दल त्यांनी माझे आभार मानले. मी या दोन देशांमधल्या संबंधाकडे ऑलिंपिक पलिकडे जाऊन बघतो. योग्य वेळी मी त्यात सहभागीसुद्धा होईन, असं राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांना म्हटलंय.