बीजिंग : तेलवाहू जहाजावरील ३२ खलाशी या दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत.
चीनच्या पूर्व किनाऱ्य़ावर इराणच्या तेलवाहूला मोठाच अपघात झाला आहे. हे तेलवाहू जहाज दुसऱ्या एका मालवाहू जहाजाला धडकलं. या तेलवाहू जहाजात १,३६,००० टन खनिज तेल होतं. टक्कर झाल्याबरोबर या तेलवाहू जहाजाला आग लागली. दुसरं मालवाहू जहाज हॉंगकॉंगहून येत होतं.
या अपघातानंतर तेलवाहू जहाजावरील ३२ खलाशी बेपत्ता झाले आहेत. तर मालवाहू जहाजावरचे २१ खलाशांची मात्र वाचवण्यात आलंय. या अपघातानंतर चीनकडून बचाव मोहीम राबवली गेलीय.
चीनच्या तटरक्षक दलाने आठ जहाजं बचाव कार्य़ासाठी पाठवली आहेत.
यात दक्षिण कोरियाची सुद्धा मदत घेण्यात आलीय. द. कोरियाने आपल्या तटरक्षक दलाचं जहाज आणि एक विमान बचाव कार्य़ासाठी पाठवलं आहे.