आता शौचालयाबाहेरही टायमर, किती वेळ आतमध्ये, कधी बाहेर आलात... सर्व माहिती सांगणार

China News: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शौचालयाबाहेर टायमर लावण्यात आला असून याद्वारे शौचायलात कोण किती वाजता गेलंय. कितीवेळ आतमध्ये आहे, कधी बाहेर आला याची सर्व माहिती मिळणार आहे.

राजीव कासले | Updated: Jun 13, 2024, 07:05 PM IST
आता शौचालयाबाहेरही टायमर, किती वेळ आतमध्ये, कधी बाहेर आलात... सर्व माहिती सांगणार title=

Timer in toilet: चीनमधल्या युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ असलेल्या युगांग ग्रोटोजचा (Yungang Grottoes) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या ठिकाणच्या स्थानिक प्राधिकरणाने इथल्या शौचालयात (Toilet) चक्क टायमर बसवला आहे.  CNN च्या वृत्तानुसार, युनेस्कोच्या (unesco) जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेले युगांग ग्रोटोज जगभरातील पर्यटकांना (Tourists) आकर्षित करतं. पण युगांग ग्रोटोज प्राधिकरणाने इथल्या महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये टाइमर बसवलंय, यामुळे हे ठिकाणी पुन्हा चर्चेत आलं आहे. या ठिकाणी आलेल्या एका पर्यटकाने आपल्या मोबाईलमध्ये याचं चित्रीकरण केलं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केलं. त्यानंतर ही बाब समोर आली. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत शौचालय खाली असल्यास बाहेरचा एलएडी रंगाचा असेल. पण ज्यावेळी शौचायलाचा वापर होत असेल त्यावेळी बाहेरच्या स्क्रिनवर मिनटं आणि सेकंदात टायमर सुरु राहिल. शौचालयातील व्यक्ती किती वेळ आतमध्ये होता, किती वेळ त्याने शौचालयाचा वाप केला याची वेळ स्क्रिनवर दाखवली जाईल. 

युनेस्कोच्या यादीत युंगांग ग्रोटाजचा समावेश
चीनच्या शांक्सी प्रांतातल्या डाटोंग शहरात युंगांग ग्रोटोज असून 252 गुफा आणि 51 हजार बुद्ध मूर्तींसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. 2001 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून युंगांग ग्रोटाजला मान्यता दिली आहे. या ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. 2023 मध्ये जवळपास 30 लाख पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली होती. युनगांग ग्रोटोजच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार टॉयलेट टायमरचा वापर यावर्षी 1 मे पासून केला जात आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या तंत्रज्ञानासाठी वापरण्यात आलेली रक्कम अतिरिक्त शौचालये बांधण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे खर्च करता आली असती, असे लोकांचे म्हणणे आहे.

युंगांग ग्रोटाज
चीनच्या दातोंग शहरापासून जवळपास 16 किमी पश्चिमेला वुझोऊ शान पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या शि ली नदीच्या किनारी युंगांग ग्रोटाज आहे. पाचव्या आणि सहाव्या शतकातील कलाकुसरीचा हा उत्तम नमुना आहे. इथे प्रमुख 53 गुफा आहेत. तर 1,100 छोट्या गुफा आहेत. याशिवाय 51,000 कोरीव बुद्ध मूर्ती आहेत. गुफांची लांबी जवळपास 2600 किमी इतकी तर 30 ते 60 फूट उंची आहे. 2001 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये याचा समावेश करण्यात आला.