Woman Died In Park : पार्कात झोपणं एका महिलेच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. पार्कात आलेली एक महिला गवतावर (Grass) झोपली होती. फारशी गर्दी नसल्याने पार्कात गवत कापण्याचं काम सुरु होतं. एक कर्मचारी मोठ्या मशीनने (Cutting Machine) गवत कापत होता. त्याचवेळी त्याची नजर महिलेच्या मृतदेहावर पडली. त्या महिलेच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. काही वेळापूर्वीच या कर्मचाऱ्याने त्या भागातलं गवत कापलं होतं, पण गवत कापताना तिथे झोपलेली महिलाही त्याच्या मशीन खाली होती. झोपलेल्या महिलेला या कर्मचाऱ्याने पाहिलं नसल्याचं त्याने सांगितलं.
अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात (California) ही धक्कादायक घटना घडली. बिअर्ड ब्रूक असं कर्मचाऱ्याचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. नजरचुकीने ही घटना घडल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला आहे. बिअर्ड ब्रक मशीनने गवत कापण्याचं काम करत होता. काम करताना बिअर्डने कानावार हेडफोन लावला होता. पार्कात गवत कापत असताना तिथे झोपलेली महिला त्याच्या नजरेस पडली नाही. तसंच कानावर हेडफोन आणि मशीनचा आवाज यामुळे त्याला महिलेच्या किंकाळ्या ऐकू आल्यान नाहीत, असं त्याने म्हटलं आहे.
कर्मचारी बिअर्ड ब्रूक अतिशय बेजबाबदारपणे काम करत असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. मृत महिलेचं ना चावेज असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे महिलेच्या शरीराचे दोन तुकडे झाल्यानतंर बिअर्ड ब्रूकने ते तुकडे गवताने झाकून टाकले आणि तिथून पळ काढला. यानंतर चावेज बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या मोठ्या बहिणीने पोलिसात केली. पोलिसांनी शोध घेतला असात चावेजचा मृतदेह पार्कात आढळला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीन तपास सुरु केला. यावेळी पार्कातला कर्मचारी बिअर ब्रुकवर त्यांचा संशल बळावला.
पोलिसांनी बिअर ब्रुकला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. सुरुवातीला त्याने इन्कार केला, शेवटी आपल्याकडून चुकून ही घटना घडल्याचं कबूल केलं.
इंडोनेशियात रिव्हेंज पॉर्न
दरम्यान, इंडोनेशियात एक रिवेंज पॉर्नचं प्रकरण समोर आलं आहे. याप्करणी कोर्टाने एका आरोपीला सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एखाद्या व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडिओ त्याच्या संमती शिवाय सोशल मीडियावर शेअर करण्याला रिव्हेंज पॉर्न म्हणतात. आरोपीचं नाव अल्वी हुसेन मु्ल्ला आहे. एका मुलीला बेशुद्ध करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारादरम्यान तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले होते. हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून आरोपी तिला ब्लॅकमेल करत होता. कोर्टाने सुनावली शिक्षा खूपच कमी असल्याचं पीडित मुलीच्या कुटुंबियांनी म्हटलंय.