Most Expensive Weddings: लग्न म्हटलं की तामझाम आलाच. त्यातू खर्चही आलाच. हल्ली अनेक उच्च मध्यमवर्गीय माणसंही फार मोठ्या प्रमाणात लग्न उरकताना दिसत आहेत त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही लागून राहिलेली असतेय. त्यातून कोणी किती रूपये लग्नासाठी खर्च केले हे पाहून तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच दोन महागड्या लग्नांबद्दल आपण बोलणार आहोत. यावेळी तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. या लग्नाचा तामझाम हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे या दोन्ही लग्नांची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. खरंतर या लग्नांपैंकी एका लग्नाची जोरात होती. हे लग्न 1981 साली इंग्लंडमध्ये पार पडलं तर दुसरी दोन लग्नं हे भारतात पार पडली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगेलली होती. या दोन्ही लग्नांची चांगलीच चर्चा तर होती परंतु त्यांच्या लग्नातल्या खर्चाबद्दल जाणून घेऊन तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
आपण पहिल्या लग्नाबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नाविषयी. हे लग्न 1981 साली पार पडले. प्रिन्सेस डायना आता या जगात नाहीत. परंतु त्यांच्याबद्दल आजही माध्यमांतून लिहिलं आणि बोललं जातं. या लग्नासाठी खूप खर्च करण्यात आला होता, अर्थात हे एक रॉयल वेडिंग होते. त्यामुळे या लग्नाची जगात चर्चा रंगलेली होती.
रिपोर्ट्सनुसार प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नाचा खर्च हा 110 मिलियन युएस डॉलर म्हणजेच 914 कोटी रूपये इतका होता. त्यामुळे या लग्नाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यावेळी त्यांचे हे लग्न लाईव्ह 28.4 मिलियन प्रेक्षकांनी जगभरातून पाहिले होते. यावेळी फक्त लग्नाचा खर्चचं नाही. तर लग्नासाठी जगभरातून पाहुणे आले होते. सोबतच मोठ्या प्रमाणात पाहूणे जगभरातून आले होते. लग्नासाठीचे जेवण, पॅलेसचे डेकोरेशन आणि प्रिन्स आणि प्रिन्सेस यांचे कपडे यावरही मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. प्रिन्सेस डायना यांच्या पांढऱ्या गाऊनचीही विशेष चर्चा होती. या ड्रेसची किंमत ही 4.1 कोटी रूपये इतकी होती. या पाहुण्यांकडून त्यांना 3000 हून अधिक भेटवस्तू मिळाल्या होत्या.
आम्ही दुसऱ्या दोन लग्नांबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या लग्नाविषयी. ईशा अंबानी यांचे लग्न आनंद पिरामल यांच्याशी झाले. साधारणपणे त्यांच्या लग्नात 400 कोटी रूपये खर्च झाले होते. यावेळी ईशा अंबानी यांनी घातलेल्या लेहेंग्याची किंमतही 90 कोटी रूपये इतकी होती. श्लोका आणि आकाश अंबानी यांच्या लग्नावरही प्रचंड पैसे खर्च करण्यात आले होते.