सिडनी: लग्न म्हटलं की खूप धावपळ असते. सागरसंगीत तयारी खरेदी आमंत्रण तो मोठा आणि अविस्मरणीय सोहळाच असतो. हा सोहळा नवरदेवाशिवाय तर पूर्ण होणं अशक्य असतं. मात्र एका महिलेनं नवरदेवाशिवाय लग्न केलं आहे. या लग्नाची खूप चर्चा होत आहे. हे लग्न नेमकं झालं तरी कसं असा अनेकांना प्रश्नही पडला.
पत्रिका वाटल्या, खरेदी झाली लग्नासाठी पाहुणेही आले मात्र नवरदेव कुठेच दिसत नव्हता. त्यामुळे अनेकांना हाच प्रश्न पडला. मात्र नवरदेवाशिवाय लग्न पार पडलं. या लग्नानंतर पाहुण्यांसाठी विशेष पार्टीही ठेवण्यात आली होती. 28 वर्षांच्या पॅट्रीशिया क्रिस्टिन या तरुणीनं अनोख्या पद्धतीनं लग्न केलं आहे. हे लग्न सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरलं आहे.
पॅट्रिशियाचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर 8 वर्षांनंतर त्यांचं नातं तुटलं. त्यानंतर तिने फक्त आपला विचार केला. या सगळ्यातून तिने स्वत:ला सावरलं. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी इथे राहणाऱ्या या तरुण महिलेनं स्वत:साठी जगायचं ठरवलं. ती व्यवसायाने शिक्षिका आहे. त्यांचं नातं तुटल्यानंतर तिने लग्नाची घोषणा केली.
तिने फुले आणि एक सुंदर गाऊन देखील आणला. तिने आपल्या मित्रांना लग्नासाठी आमंत्रित केलं. त्याने हा अनोखा विवाह सोहळा केला. सेल्फ कमिटमेंट असं या लग्न सोहळ्याला नाव दिलं. पॅट्रिशाने सांगितले की आतापासून ती स्वतःशीच लग्न करणार आहे आणि ती हे नातं प्रामाणिकपणे जपणार आहे.
या लग्न समारंभाला 9 खास फ्रेण्ड सहभागी झाले होते. स्वत: स्वत:शी लग्न करण्याचा हा अनोखा सोहळा विशेष चर्चात होता. तिने आपल्या या खास नात्यात स्वत:वर भरभरून प्रेम करण्याचं आवाहन दिलं आहे. संपूर्ण सेलिब्रेशनवर तिने साधारण 5 हजार रुपये खर्च केले होते.