मुंबई : परक्या बाळाला देखील आपलं मानण्याची शक्ती फक्त मातृत्त्वात असते. याचीच प्रचिती देणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका आरोपी महिलेचं मुलं रडत होतं आणि त्या महिलेविरुद्ध कोर्टात सुनावणी चालू होती. त्या रडत्या बाळाला बघून महिला पोलीस असलेल्या एका स्त्रीचे मातृत्व जागृत झाले आणि तिने त्या बाळाला दूध पाजले. हा हळवा, भावनिक क्षण पोलीस स्थानकातील इतर कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केला.
हा फोटो चीनमधल्या आहे. या बाळाच्या आईवर पैशांच्या घोटाळ्यासंबंधित आरोप होते. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी चालू होती. यालयात जाण्यापूर्वी तिने आपल्या तान्ह्या बाळाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पण काही काळानंतर ते बाळ रडू लागलं आणि काही केल्या ते शांत होत नव्हतं.भुकेने ते रडत असल्याचं इथल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं. तिला देखील काही महिन्याचं बाळ असल्याने बाळाचे रडणे ऐकून तिला पाझर फुटला आणि तिने या बाळाला स्तनपान केलं.