मूत्रापासून बनणार इंधन, संशोधकांनी शोधली खास पावडर

जे निसर्ग निर्मित असते ते कधीच टाकाऊ नसते, असे म्हटले जाते. याची आणखी एक प्रचिती संशोधकांना आली आहे. संशोधकांनी एक अशी अॅल्युमिनियम नॅनो पावडर बनवली आहे की, जी मूत्रापासूनही इंधन निर्मिती करू शकते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 28, 2017, 05:17 PM IST
मूत्रापासून बनणार इंधन, संशोधकांनी शोधली खास पावडर title=

नवी दिल्ली : जे निसर्ग निर्मित असते ते कधीच टाकाऊ नसते, असे म्हटले जाते. याची आणखी एक प्रचिती संशोधकांना आली आहे. संशोधकांनी एक अशी अॅल्युमिनियम नॅनो पावडर बनवली आहे की, जी मूत्रापासूनही इंधन निर्मिती करू शकते.

संशोधकांनी बनवलेल्या या अॅल्युमिनियम नॅनो पावडरचा संपर्क मूत्रासोबत येता काही क्षणातच त्याचे रूपांतर हायड्रोजनमध्ये होते. ज्याचा वापर सेलला उर्जा देण्यासाठी तसेच स्वच्छ उर्जा उपलब्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो. ही पावडर बनविणाऱ्या संशोधकांमध्ये एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे. यूएस आर्मी रिसर्च लॅबोरेटरीमध्ये (एआरएल) या शोधाबाबत घोषणा करण्यात आली. ही घोषणा करताना संशोधकांनी दावा केला आहे की, आम्ही तयार केलेली पावडर पाण्याच्या संपर्कात आली तरीसुद्धा शुद्ध हायड्रोजनची निर्मिती करू शकते.

संशोधकांनी पाण्यासोबत मिश्रण होणारी एक अशी पावडर तयार केली आहे की, या पावडरचा मूत्रासोबत संबंध येताच त्यातून दर्जेदार हायड्रोजनची निर्मिती होते. एआरएलचे संशोधक क्रिस्टोफर डार्लिंग यांनी म्हटले आहे की, 'आर्मी संशोधक म्हणून आमचे कामच आहे की, एक असे तंत्रज्ञान निर्माण करणे की, ज्यामुळे सैनिकांना त्याचा थेट फायदा होईल. तसेच, त्यांच्या क्षमतांचा विकास होईल'. हे तंत्र इतर क्षेत्रातही वापरता येऊ शकते असा दावाही संशोधकांनी केला आहे.