भयंकर! अंघोळीनंतर गेली दृष्टी, महिलेला छोटीशी चूक पडली महागात

अंघोळीदरम्यान तुम्ही देखेली ही चूक करत असाल तर आताच सावध व्हा... वाचा काय झालं  

Updated: Oct 10, 2022, 04:35 PM IST
भयंकर! अंघोळीनंतर गेली दृष्टी, महिलेला छोटीशी चूक पडली महागात title=

Trending News : डोळे हा मानवी शरीराचा सर्वात संवेदनशील भाग आहे. त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असतं. एका छोट्याशा चुकीमुळे तुमची दृष्टीही जाऊ शकते. असाच एक धक्कादायक प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. मेरी मेसन असं या महिलेचं नाव आहे. मेरीने स्वप्नातही विचार केला नव्हता की एका छोट्याशा चुकीमुळे तिची दृष्टी गमवावी लागेल. जाणून घेऊया मेरीसोबत असं काय घडले, ज्यामुळे तिला कायमची दृष्टी गमवावी लागली.

काय आहे प्रकरण
54 वर्षीय मेरी मेसन डोळ्यांसाठी कॉन्टॅक्ट लेन्स (contact lenses) वापरायची, पण एके दिवशी लेन्स काढायची विसरली आणि लेन्स घालूनच तिने अंघोळ केली. पण यामुळे तिच्या डोळ्यात संसर्ग झाला आणि यामुळे तिची दृष्टी गेली. मेरीच्या डाव्या डोळ्यात संसर्ग झाला. वास्तविक, अंघोळ करत असताना, पाण्यात असलेला सूक्ष्म अमीबा कॉर्निया (cornea) आणि डोळ्याच्या कॉन्टॅक्ट लेन्समध्ये अडकला. Acanthamoeba keratitis हा एक दुर्मिळ संसर्ग आहे जो सूक्ष्म जीवांमुळे होतो. ज्यामुळे दृष्टी नष्ट होतं आणि पूर्ण अंधत्व येतं.

मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या लेन्सेस मिळतात. त्या वापरण्याची मुदत 1 दिवस, 1 महिना किंवा 6 महिन्यांपर्यंत असते. मेरी 1 महिन्यांची मुदत असलेली लेन्स वापरत होती. अंघोळीदरम्यान पाण्यातील सूक्ष्म अमीबा डोळ्यांचा पडदा आणि लेन्सदरम्यान अडकला त्यामुळे हळू हळू संसर्ग वाढू लागला. 

दृष्टी कमी होत असल्याने मेरीने डॉक्टरकडे धाव घेतली. डॉक्टरने तिला ऑपरेशन (Operation) करण्याचा सल्ला दिला. तिच्या डोळ्यांवर तब्बल तीन 
ऑपरेशन करावी लागली. पण यानंतरही फायदा झाला नाही. इंग्लंडलमध्ये रहाणाऱ्या मेरीला या गोष्टीचा मोठा फटका बसला आहे. ज्या ठिकाणी ती नोकरी करत होती ती नोकरीही तिला सोडावी लागली. कारण हॉस्पीटलमध्ये तिला आठवड्यातून दोन ते तीन वेळा किंवा त्याहीपेक्षा जास्तवेळा जावं लागत होतं. 

मेरीने केलं लोकांना आवाहन
आपल्याबरोबर घडलेल्या या दु:खद घटनेनंतर मेरीने लोकांना लेन्स वापरताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच कॉन्टेक्ट लेन्स बनवणाऱ्या कंपन्यांनी बॉक्सवर लेन्स वापरताना कोणती काळजी घ्याल याविषयी माहिती द्यायली हवी. जेणेकरुन माझ्या वाट्याला जे दु:ख आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये असं मेरीने म्हटलं आहे.