13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य

13 unlucky number: जगात 13 क्रमांक अशुभ का मानला जातो? अखेर यामागचं रहस्य काय? हाच प्रश्न Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वारंवार विचारण्यात येतो. म्हणून आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. 

नेहा चौधरी | Updated: Dec 13, 2023, 11:45 PM IST
13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य title=
Why is the number 13 considered inauspicious People also avoid using it know the secret behind it

13 Number Considered Unlucky Why : या जगात लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी मान्यता. त्यातूनच शुभ आणि अशुभ या गोष्टी आल्या आहेत. मांजर आडवी गेली ते अशुभ असतं हे भारतीय मानतात. त्याशिवाय डोळा फडफडाला की आपण शुभ आणि अशुभ या गोष्टी करतो. यातीलच एक भाग म्हणजे 13 हा नंबर जगभरात अशुभ मानला जातो. पण यामागचं कारण काय आहे, हे अनेकांना आजही माहिती नाही. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Why is the number 13 considered inauspicious People also avoid using it know the secret behind it)

युरोप असो की अमेरिका, जगातील अनेक देशांमध्ये 13 हा अंक अत्यंत अशुभ मानला गेला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या नंबरवर कोणी कुठलंही काम करत नाही. त्यासोबतच जगभरातील सर्व हॉटेल्समध्ये 13 अंकी रुम (13 unlucky number)  देखील नसते. या तारखेवर लोक लग्नही काय अगदी सण साजराही करायला आवडत नाही. या देशातील लोक या स्वतःच्या जिभेवर हा नंबरदेखील चुकूनही येऊ देत नाही. पण तुम्हाला या मागील कारण माहिती आहे का? जगभरात ही संख्या अशुभ का मानली जाते. 

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, 13 नंबरपासून अंतर ठेवण्यामागे अनेक रहस्ये आणि अनेक प्रकारच्या समजुती आजही पाळल्या जात आहेत. ख्रिश्चन लोक 13 हा आकजा अशुभ मानतात. यामागे एक कारण आहे, येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांसह घेतलेल्या शेवटच्या रात्रीच्या जेवण्यात त्यांच्यासोबत 13 जण होते. अशी आख्यायिका आहे की, त्या वेळी यहूदाने येशूचा विश्वासघात केला होता. एवढंच नाही तर येशूला वधस्तंभावर खिळे ठोकून त्यांचा जीव घेतला होता. येशू यांना वधस्तंभावर खिळला गेला होता तो दिवस हा शुक्रवार होता. म्हणून ख्रिश्चन लोक शुक्रवार हा दिवस आणि त्यासोबत 13 हा आकडा अशुभ मानतात. 

लोक चुकूनही त्याचा वापर करत नाहीत

13 क्रमांकाच्या या भीतीला ट्रिस्कायडेकाफोबिया किंवा थर्टीन डिजिट फोबिया असंही म्हटलं जातं. पाश्चात्य देशांमध्ये, ही भीती इतकी वाढली की त्या लोकांनी 13 नंबर ही संख्या वापरणच बंद करुन टाकलं. एवढंच नाही तर 13 नंबर वापरणं हे पाप मानलं जाऊ लागलं. त्यामुळे परदेशात कोणत्याही हॉटेलमध्ये 13 क्रमांकाची खोली किंवा कोणत्याही इमारतीत 13 व्या मजल्या किंवा घरही नसतं. एखाद्या हॉटेलने असे केले तर लोक त्या हॉटेलला अशुभ ठरवतात. त्या हॉटेलमध्ये जाऊन राहणे ते लोक पसंत करत नाहीत. युरोपियन-अमेरिकन देशांमध्ये आपल्याला रेस्टॉरंटमध्ये टेबल क्रमांक 13 आढळणार नाही. फ्रान्समध्ये डायनिंग टेबलवर 13 खुर्च्या ठेवल्या तर लोक त्या ठिकाणी बसणं टाळतात. 

भारतात काय?

13 अंकाची भीती केवळ पाश्चिमात्य देशांमध्येच नाही तर भारतातही बघितली जाऊ शकते. इथेही अनेक लोक या अंकाला अशुभ ठरवलं आहे. चंदीगड हे शहर देशातील सर्वात सुनियोजित शहर असून हे शहर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वप्नातील शहर होतं. पण अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, या सुनियोजित शहरात सेक्टर 13 तुम्हाला दिसणार नाही. या शहराचा नकाशा तयार करणाऱ्या आर्किटेक्टने 13 नंबरचं सेक्टरच तयार केलं नाही. कारण तो आर्किटेक्ट 13 अंकाला अशुभ मानत होता. त्यामुळे या आर्किटेक्टला परदेशातून खास बोलवण्यात आलं होतं. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)