नवी दिल्ली : सोळाव्या लोकसभेत संसदेतील शेवटच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता कर्जबुडव्या विजय मल्ल्यावर निशाणा साधला. त्यानंतर लगेच मल्ल्याने एका पाठोपाठ एक टि्वट करुन उत्तर दिले आहे. एक व्यक्ती ९ हजार कोटी रुपये घेऊन देशाबाहेर पळाला असं पंतप्रधान मोदी लोकसभेतील भाषणात म्हणाले. पण त्यांनी नावाचा उल्लेख केला नाही. त्यांचा रोख मात्र माझ्याकडे होता. ते चांगले वक्ते आहेत. मी जे पैसे द्यायला तयार आहे. ते स्वीकारण्याचे बँकांना निर्देश देत नाहीत ? असं मी अत्यंत विनंतीनं मोदींना विचारु इच्छितो, असंही त्याने म्हटले आहे.
Am appalled to say the least at the media reports on the Enforcement Directorate claims that I hid my wealth ! If there was hidden wealth how could I put approximately 14,000 crores worth of assets openly in front of Court ? Shameful misleading of public opinion but unsurprising.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 14, 2019
The Prime Ministers last speech in Parliament was brought to my attention. He certainly is a very eloquent speaker. I noticed that he referred to an unnamed person who “ran away” with 9000 crores. Given the media narrative I can only infer that reference is to me.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 14, 2019
किंगफिशरला दिलेल्या कर्जाची वसुली केल्याचे श्रेय पंतप्रधान घेऊ शकतात असे मल्ल्याने टि्वटमध्ये म्हटले आहे.कर्जाच्या परतफेडीसंबंधी आपण कर्नाटक उच्च न्यायालयात प्रस्ताव ठेवला होता. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. तो माझा प्रामाणिक प्रयत्न होता. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. किंगफिशर एअरलाईन्सला दिलेले पैसे बँकांनी का घेतले नाहीत? असा सवाल मल्ल्यानं टि्वटमधून केला आहे.
Following on from my earlier tweet, I respectfully ask why the Prime Minister is not instructing his Banks to take the money I have put on the table so he can at least claim credit for full recovery of public funds lent to Kingfisher.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 14, 2019
दरम्यान, मी माझी संपत्ती लपवून ठेवली, असा ईडीचा दावा आहे. माझ्याकडे लपवलेली संपत्ती असती तर कोर्टासमोर मी १४ हजार कोटी रुपयांची संपत्ती कशी जाहीर केली, असा सवाल मल्ल्याने केला आहे. विजय मल्ल्या देशातला पहिला फरार आर्थिक गुन्हेगार आहे. तो बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवून ब्रिटनला फरार झाला. आता विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.