पाकिस्तानने पुढील 11 दिवसांत कारवाई करावी - ट्रम्प

अमेरिकेकडून पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका बसलाय.

Updated: Jan 5, 2018, 04:59 PM IST
पाकिस्तानने पुढील 11 दिवसांत कारवाई करावी - ट्रम्प title=

मुंबई : अमेरिकेकडून पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका बसलाय.

हक्कानी आणि तालिबान दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून मिळणारी रसद जोवर थांबत नाही, तोवर पाकिस्तानाला कुठलही सुरक्षाविषयक आर्थिक मदत मिळणार नाही असं अमेरिकेनं म्हटलयं. पाकिस्तान प्रशासनाला हक्कानी आणि तालिबानशी संबंधित 27 दहशतवाद्यांची यादी देण्यात आली आहे. या 27 जणांना पाकिस्तानमधून सातत्यानं मदत होते.

हे दहशतवादी अफगाणिस्तानात अस्थिरता परवतात. दहशतवादी हल्ले करून अमेरिकन सैन्याशी लढा पुकारतात...पाकिस्तानला वारंवार याविषयी पुराव्यासह माहिती दिली गेलीय. पण त्यांच्याबाजूनं या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी कुठलीही कारवाई झालेली नाही. गेल्या चार महिन्यात पाकिस्तानातून याविषयी कुठलंही सकारात्मक पाऊल उचललं नाही. म्हणून पाकिस्ताननं पुढच्या 11 दिवसात या सर्वांना कारवाई करावी, अन्यथा सगळ्याच प्रकराची मदत तात्काळ रद्द होईल असं ट्रम्प प्रशासनानं म्हटलंय.