इस्राईल पंतप्रधान नेत्यनाहू मोदींना देणार अनोखी भेट...

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू १४ जानेवारीपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. 

Updated: Jan 5, 2018, 12:51 PM IST
इस्राईल पंतप्रधान नेत्यनाहू मोदींना देणार अनोखी भेट...  title=

नवी दिल्ली : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू १४ जानेवारीपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. 

यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी चक्क एक जीप भेट म्हणून घेऊन येणार असल्याची चर्चा आहे... आणि ही जीपदेखील साधीसुधी नाही, तर समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी तयार करणारी...

'गाल-मोबाईल वॉटर डिसॅलिनिसेशन अँड प्युरिफिकेशन जीप' ते मोदींनी भेट देणार आहेत. गत वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान मोदी इस्त्रायल दौऱ्यावर गेले असताना भूमध्य समुद्रकिनारी दोन्ही नेत्यांनी या जीपचं प्रात्यक्षिक बघितलं होतं.

पंतप्रधान मोदी या जीपवर बेहद्द खूश झाले होते. त्यानंतर आता इस्त्रायल-भारत मैत्रीचं प्रतिक म्हणून ही जीपच भारताला भेट देण्याचा निश्चय नेत्यनाहू यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या जीपची किंमत १ लाख ११ हजार डॉलर असल्याचं सांगितलं जातंय.