Viral Trending Video : जगभरात ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो आहे. नाताळ म्हटलं की, बच्चे कंपनींमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्येही नाताळाचा फिव्हर दिसून येतो. नाताळ हा सण ख्रिश्चन लोकांचा असला तरी तो इतर लोकही मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतात. नाताळ म्हणजे सांता, सिक्रेट सांता गेम, चॉकलेट, केक आणि खूप सारे गिफ्ट...नाताळ सणानिमित्त एकमेकांना गिफ्ट देण्यात येतं. सिक्रेट सांता या खेळात आपल्या सहकार्याला गिफ्ट दिलं जातं. अशावेळी समोरच्या व्यक्तीला आवडेल असं गिफ्ट काय द्यायचं असा प्रश्न आपल्या पैकी प्रत्येकालाच पडतो. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ज्यामध्ये 7वीत शिकणाऱ्या मुलांनी 30 वर्षे वयाच्या लोकांना भेट म्हणून काय दिले पाहिजे याबद्दल सांगितलं आहे. (What to gift 30 year olds for Christmas You will be surprised to hear the idea given by the 7 class students video viral )
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकाने विचारलं की, 30 वर्षे वयाच्या लोकांना ख्रिसमससाठी काय गिफ्ट द्यायचं? त्यावर एका मुलाने सांगितलं की, त्यांना स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर द्यायला पाहिजे. दुसऱ्या मुलाने जे सांगितलं ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. तो म्हणला की 30 वर्षांच्या लोकांना भेटवस्तू म्हणून वाइन आणि हिप इम्प्लांट दिलं पाहिजे. दुसर्या मुलाने सांगितले की त्यांना सूप द्यायला पाहिजे. तर कोणीतरी रात्रीच्या खेळासाठी बिंगो कार्ड देण्याची आयडिया दिली. अजून एका मुलाने लिहिलंय की, आंघोळीसाठी आणि शरीरासाठी वापरली जाणारी उत्पादनं त्यांना दिली पाहिजेत. तर कोणी महागडे मांस तर काही मुलांनी परफ्यूम द्यायला पाहिजे असं सांगितलं. तर एकाने सांगितले की त्यांना कँडी क्रश गेमचे प्रीमियम आणि रिंकल रिमूव्हल क्रीम द्याला पाहिजे.
मात्र, काही मुलं अशी आहेत की, हिवाळा लक्षात घेऊन त्यांना कॉफी प्यायला एक मग द्यावा, असा सल्ला दिला. ख्रिसमस गिफ्टच्या आयडिया ऐकून सोशल मीडियावर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील शाळेतील शिक्षक शेन फ्रेक्सने यांनी तयार केला आहे. त्यांनी तो TikTok वर शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला आहे. फ्रेक्स म्हणतात की या 12 वर्षांच्या मुलांना 30 वर्षांचे लोक जुन्या काळातील आणि म्हातारी लोक वाटतात. फ्रेक्सने बनवलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 7thgrade_chronicles नावाच्या अकाउंटवरून करण्यात आला आहे.