कुत्र्याने पुर्ण केला मुलाचा होमवर्क, VIDEO व्हायरल

कुत्रा आणि मुलाचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आनंदित करेल. 

Updated: Oct 14, 2021, 04:32 PM IST
कुत्र्याने पुर्ण केला मुलाचा होमवर्क, VIDEO व्हायरल title=

मुंबई : कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. जो बहुतेक लोकांना आवडतो. कुत्रा हा सर्वात प्रामाणिक आणि विश्वासार्ह प्राणी मानला जातो, परंतु आपण कल्पना करू शकता की हा कुत्रा मुलाला वाचण्यास देखील मदत करू शकतो.होय, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कुत्रा मुलाला होमवर्क पूर्ण करण्यात मदत करत आहे.

कुत्रा आणि मुलाचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आनंदित करेल. व्हिडिओमध्ये, कुत्रा मुलाला होमवर्क पूर्ण करण्यात मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्राम पेज एका युजरने शेअर केलाये.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

हक्स नावाचा कुत्रा कदाचित मुलाचा होमवर्क समजू शकत नाही, पण तो तिथे बसून त्याला   होमवर्क पूर्ण करण्याचा आग्रह करत आहे. दरम्यान दोघांमध्ये मजामस्ती देखील सुरु आहे.

हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि 29,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.