VIDEO : पाकिस्ताच्या मंत्र्याचा चारचौघात अपमान; चोर-चोर म्हणत विरोधकांनी वाभाडे काढले आणि...

कॉफी शॉपमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी घातला घेराव

Updated: Sep 26, 2022, 09:40 AM IST
VIDEO : पाकिस्ताच्या मंत्र्याचा चारचौघात अपमान; चोर-चोर म्हणत विरोधकांनी वाभाडे काढले आणि... title=

श्रीलंकेप्रमाणे (sri lanka) भारताच्या शेजारील देश पाकिस्तानही (pakistan) आर्थिक संकटासोबत (inflation) महापुराच्या (flood) समस्येसोबतही झुंज देत आहे. पाकिस्तानात इम्रान खान (imran khan) यांचे सरकार कोसळ्यानंतर नवीन आलेल्या सरकारवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. विरोधकांकडून महागाईसाठी शहबाज शरीफ (shahbaz sharif)  सरकार जबाबदार असल्याची आरोप केला जात आहे. मात्र पाकिस्तानची जनता सर्वच राजकारण्यांना या परिस्थितीसाठी कारणीभूत ठरवत आहेत. अशातच जगभरात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांकडून पाक सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे.

पाकिस्तानच्या माहिती मंत्री आणि नवाझ शरीफ (shahbaz sharif) यांची मुलगी मरियम औरंगजेब (Maryam Aurangzeb) यांचा लंडनमधला (london) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कॉफी शॉपमध्ये गेलेल्या मरियम (Maryam Aurangzeb) यांना तिथे राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी घेराव घातला आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे (flood) झालेल्या विध्वंसामुळे त्यांनी मरियमवर टीका केली होती.

मरियम औरंगजेब यांना लंडनमधील कॉफी शॉपमध्ये (coffee shop) पाकिस्तानी (pakistan) नागरिकांनी घेरलं होतं. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील  पुरामुळे झालेल्या विध्वंसाच्या दरम्यान मंत्र्यांच्या परदेश दौर्‍यावरुन टीका करण्यात येत आहे. कॉफी शॉपमध्ये नागरिकांनी मरियम यांचा पाठलाग करत रस्त्यावरच त्यांचा 'चोरनी, चोरनी'च्या असा उल्लेख केला. मात्र, यावेळी मरियमने संयम दाखवला आणि कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या स्वतःच्या मोबाईलमध्ये व्यस्त होत्या.

डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी  कॉफी शॉपमध्ये मरियम औरंगजेब यांना घेरलं होतं. व्हिडिओमध्ये एक महिला औरंगजेब यांना म्हणत होती की, "टिव्हीवर मोठे दावे केले जात आहेत, पण इथे डोक्यावर ओढणी घेत नाही."

पाकिस्तानी पत्रकार सय्यद तलत हुसैन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला उत्तर देताना मरियम औरंगजेब म्हणाल्या की, इम्रान खान यांच्या द्वेष आणि विभाजनाच्या राजकारणामुळे आमच्या भावांवर आणि बहिणींवर हा परिणाम झाला आहे. हे पाहून मला खूप दुःख झाले आहे. डॉनच्या वृत्तानुसार, मरियम औरंगजेब यांनी तिथे थांबून संतप्त जमावाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्याचे सांगितले.

पाकिस्तानचे अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी मरियमचा बचाव केला आहे. अशी परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ट्विटरवर म्हटलं की, ब्रिटनाला गेल्यानंतरही काही लोकांच्या वागण्यात बदल झालेला नाही. तिथे राहणारे पाकिस्तानी आपल्या समाजातील सर्वात खालच्या स्तराचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचवेळी नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी ही घटना पीटीआयच्या गुंडांनी केलेली अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद कृती असल्याचे म्हटले आहे.