Khosta-2: शास्त्रज्ञांना सापडला Corona सारखा दुसरा व्हायरस; लसही ठरतेय फेल!

नुकत्याच आलेल्या बातम्यांमुळे आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढू शकते.

Updated: Sep 26, 2022, 06:58 AM IST
Khosta-2: शास्त्रज्ञांना सापडला Corona सारखा दुसरा व्हायरस; लसही ठरतेय फेल! title=

मुंबई : जगभरात शेकडो विषाणू आहेत, जे जीवांमध्ये पसरत आहेत आणि त्यापैकी काही जागतिक आरोग्यासाठी धोकादायक आहेत. दरम्यान, नुकत्याच आलेल्या बातम्यांमुळे आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढू शकते. संशोधकांनी वटवाघळांमध्ये एक नवीन कोरोना विषाणू शोधून काढलाय, जो मानवी लोकसंख्येला धोका देऊ शकतो.

मुख्य म्हणजे हा विषाणू मानवी पेशींना संक्रमित करू शकतो आणि कोविड-19 लसीच्या संरक्षणात्मक तो प्रवेश करण्यास सक्षम आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा समोर आलेल्या कोविड-19 बद्दल एक सिद्धांत असाही दावा करतो की, तो वटवाघळांनी पसरवला होता. मात्र, याची अद्याप शास्त्रीयदृष्ट्या पुष्टी झालेली नाही.

खोस्ता-2

ज्याप्रमाणे SARS-CoV-2 स्ट्रेन हा कोरोना व्हायरसचा एक प्रकार आहे, त्याचप्रमाणे खोस्ता-2 हा देखील कोरोना व्हायरसचाच एक प्रकार आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, खोस्ता-2 मानवाच्या पेशींमध्ये प्रवेश करते आणि यामुळे लोकांना कोरोना व्हायरससारखे गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय, एका अहवालानुसार, खोस्ता-2 सारखा खोस्ता-1 विषाणू देखील आहे, जो मानवांसाठी घातक नाही.

कसा पसरतो खोस्ता 2 व्हायरस?

हा विषाणू सध्या वटवाघुळ, रकून डॉग आणि पॅंगोलिन यांसारख्या वन्य प्राणी आणि पक्ष्यांमध्ये पसरत असल्याची माहिती आहे. हा विषाणू भविष्यात महामारीचं रूप धारण करू शकतो. यासंदर्भातील अभ्यासात सहभागी असलेल्या मायकेल लेट्को यांनी सांगितलं की, जर हा व्हायरस कोरोनामध्ये मिसळला तर त्याचा संसर्ग आणखी धोकादायक ठरू शकतो.