'या' व्यक्तीवर अटॅक करण्याच्या मूडमध्ये सिंह, पण पुढच्या क्षणी जे घडलं ते धक्कादायक, पाहा व्हिडीओ

'या' व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एख व्यक्ती झाडाखाली बसला आहे.

Updated: Jan 21, 2022, 04:43 PM IST
'या' व्यक्तीवर अटॅक करण्याच्या मूडमध्ये सिंह, पण पुढच्या क्षणी जे घडलं ते धक्कादायक, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्यामुळे नुसती जंगलात सिंहाची गर्जना जरी ऐकू आली, तरी इतर प्राण्यांचा थरकाप उडतो आणि ते तेथून पळ काढतात. प्राण्यांच्या मनात त्यांच्या जीवाची भीती असते, ज्यामुळे ते सिंहाला घाबरतात. तुम्ही विचार करा की, तुमच्या समोर अचानक सिंह आला तर? तुमचं काय होईल. हा अंगावर काटा आणणार क्षण असेल आणि या घटनेनंतर तुम्ही त्यामधून वाचणं तसं कठीण आहे. कारण तुम्ही पळून जरी गेलात तरी, तुम्हाला तो पकडनार हे मात्र नक्की.

पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो फार वेगळा आहे. परंतु तो पाहताना तुमच्या अंगावरती काटा उभा राहिल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एख व्यक्ती झाडाखाली बसला आहे आणि तेवढ्यात मागून सिंह तेथे येतो. हा सिंह दबक्या पावलाने या व्यक्तीच्या जवळ येत असतो. हे दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडेल. कारण तुम्हाला हेच वाटेल की, आता हा व्यक्ती काही वाचत नाही.

परंतु या तुम्हाला हेही दिसेल की, या व्यक्तीच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी हासू असते. बब्बर सिंहाला बघून भल्या भल्या प्राण्यांची हवा टाईट होते, परंतु तरीही देखल या व्यक्तीला काहीच कसे वाट नाही.

त्यावेळेला काही क्षणासाठी तुमच्या मनात असे येतं की, मागे काच लावलेली असावी किंवा स्क्रिन/ ग्राफिक्स असावं, म्हणून या व्यक्तीला भीती नाही. परंतु तसे ही नाही.

हा खरा सिंह आहे आणि हा सिंह खरोखर त्या व्यक्तीजवळ येतो आणि त्याच्यामध्ये कोणतीही काच देखील नाही.

हा सिंह थेट येऊन या व्यक्तीच्या जवळ प्रेमाने जातो आणि त्याच्या डोक्याला डोकं लावतो. हा व्हिडीओ तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकवेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बब्बर शेर आणि त्या व्यक्तीमधील या अप्रतिम ट्यूनिंगचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर waowafrica नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Sneaky sneaky.'

अगदी काही तासांपूर्वी पूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला या व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 64 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, सोशल मीडिया वापरकर्ते यावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. तसेच याला शेअर देखील करत आहेत.