Viral Video: संपूर्ण जगभरात सध्या मुस्लीम रमजान (Ramadan) साजरा करत आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम विशेष Taraweeh प्रार्थना करत असतात. रात्रीच्या वेळी ही प्रार्थना करत असतात. यादरम्यान, अल्जेरिया (Algeria) येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत प्रार्थना सुरु असताना एक मांजर तिथे येते आणि इमामच्या अंगावर खेळू लागते. या व्हिडीओने अनेकांची मनं जिंकली आहेत.
फेसबुकला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओत इमाम मशिदीत प्रार्थनेसाठी उभे असल्याचं दिसत आहे. अल्जेरियामधील Bordj Bou Arreridj मशिदीत ही प्रार्थना सुरु होती. मशिदीत प्रार्थनेसाठी गर्दी असते. काही मिनिटात तिथे एक मांजर पोहोचते आणि इमामच्या अंगावर उडी मारते. पण इमाम मात्र यानंतरही प्रार्थना सुरु ठेवतात. इतकंच नाही तिला गोंजरतातही. काही वेळाने मांजर त्यांच्या खांद्यावर जाऊन बसते आणि गालावर किस करण्याचाही प्रयत्न करते. पण हे सर्व घडत असताना इमाम मात्र शांत उभे राहतात. ते डोळे बंद करुन प्रार्थना म्हणणं सुरु ठेवतात. यानंतर ही मांजर खाली उडी मारते आणि तिथे फिरु लागते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओला 46 हजारांहून अधिक जणांनी लाईक केलं असून 10 हजारांहून अधिक जणांनी शेअर केलं आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "प्राण्यांनाही देवाचे शब्द कळत आहेत. मांजरही प्रार्थनेत सहभागी होत कुराण वाचत आहे," असं एकाने म्हटलं आहे. तर एकाने हा व्हिडीओ पाहून आपल्या डोळ्यात पाणी आल्याचं म्हटलं आहे.
"मांजर आपल्या कानांना आनंद देणार्या आवाजात नोबल कुराणचे पठण केल्याबद्दल आभार मानू इच्छित आहे," अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने इममाचं कौतुक केलं असून ज्याप्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिली ते पाहण्याजोगं असल्याचं म्हटलं आहे.