तरुणाने वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकला, स्पर्श करायला गेला अन्... काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Tiger Viral Video: वाघ हा रुबाबदार आणि तितकाच हिंस्र प्राणी आहे. वाघाच्या पिंजऱ्याजवळ उभं राहिल्यानेही नुसतं काळीज धडधडायला लागतं. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 3, 2023, 12:49 PM IST
तरुणाने वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकला, स्पर्श करायला गेला अन्... काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO   title=
Viral video Man Try To Pamper Tiger Big Cat Bite His Hand watch viral video

Tiger Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. एक 19 सेंकदाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय वाघासोबत मस्करी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे. या व्हिडिओत एक तरुण वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकून त्याला गोंजारत असल्याचं दिसत आहे. वाघही त्याला प्रतिसाद देताना दिसत आहे. मात्र, अचानक काळजाचा ठोका चुकवणारी घटना कैमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर लोकांनी कमेंट केल्या आहेत. 

व्हिडिओत दिसतंय की, वाघ एका पिंजऱ्यात कैद आहे. त्याचवेळी एका व्यक्ती पिंजऱ्याच्या लोखंडी गज असलेल्या जाळीतून आतमध्ये हात टाकून वाघाला गोंजारत असल्याचं दिसत आहे. वाघही त्याला प्रतिसाद देत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. मात्र, अचानक वाघ त्या व्यक्तीचा पंजाच जबड्यात ओढतो. हे इतक्या कमी वेळाच घडलं की काही कळायच्या आतच त्याचा हात पूर्णपणे जखमी झाला होता. तो व्यक्ती जीवाच्या आकांताने किंचाळत असल्याचे दिसत आहे. 

19 सेंकदाच्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती वाघाच्या पिंजऱ्याजवळ आहे. जाळीतून तुटलेल्या भागातून आत हात घातला. व वाघाला स्पर्श करत होता. एखाद्या पाळीव कुत्र्याला व मांजराला गोंजारावे तसेच तो वाघाला गोंजारत होता. मात्र, एका क्षणात वाघाने त्या व्यक्तीचा पंजाच जबड्यात पकडला. हात सोडवण्यासाठी हा व्यक्ती जीवाच्या आकांताने ओरडत होता. तर, त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही त्याच्याजवळ आले. 

हा व्हिडिओ ट्विटवर @cctvidiots नावाच्या अकाउंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला 7 लाख 30 हजाराहून अधिक व्ह्यू आणि साडेचार हजारांपेक्षा जास्त लाइल्क मिळाले आहेत. तर, शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यात अनेकांनी लिहिलंय की, वाघ जंगलाचा राजा आहे त्याच्याशी पंगा घेणे महागात पडलंय तर, एकाने म्हटलं आहे की, वाघाच्या इतक्या जवळ जाण्याची परवानगी कोणी दिली. मात्र, या व्हिडिओ कधीचा आहे व ही घटना कुठे घडली आहे, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाहीये. 

दरम्यान, काही जणांनी कमेंटमध्ये लिहलं आहे की, तो व्यक्ती अभयारण्यातील कर्मचारी असून गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर, एकाने म्हटलं आहे की, जखम आणि वेदना सहन न करु शकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, मात्र, याबाबत ठोस माहिती अद्याप कळू शकलेली नाहीये.