व्हिडिओ : जेव्हा गुरुद्वारात नमाज पढताना दिसला व्यक्ती...

केवळ २४ तासांत हा व्हिडिओ ४५६ जणांनी शेअर केलाय

Updated: Aug 25, 2018, 01:19 PM IST
व्हिडिओ : जेव्हा गुरुद्वारात नमाज पढताना दिसला व्यक्ती... title=

नवी दिल्ली : अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून समाजात तणाव निर्माण होताना दिसतो. धर्माच्या नावावर लोक एकमेकांचा जीव घ्यायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. अशा वेळी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  या व्हिडिओत गुरुवाणी सुरु असलेली दिसते... तर समोर एक मुस्लीम व्यक्ती नमाज अदा करतानाही दिसतोय. जाती-धर्माच्या नावाखाली दंगे घडवणाऱ्या लोकांनी या व्हिडिओतून खरंच शिकण्यासारखं आहे. 

हा व्हिडिओ मलेशियातला आहे. इथल्या एका गुरुद्वारामध्ये गुरुवाणी सुरू आहे. लोक एकत्र बसून गुरुवाणीचा आनंद घेत आहेत. तर समोरच असलेला निळ्या शर्टातील व्यक्ती नमाज पढत आहे. नमाज अदा करण्यासाठी या व्यक्तीला लपाछुपीचा खेळ खेळावा लागला नाही तर त्यानं उघडपणे सर्वांदेखत नमाज अदा केला. 

हा व्हिडिओ  SikhInside या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आलाय. केवळ २४ तासांत हा व्हिडिओ ४५६ जणांनी शेअर केलाय.