बाईsss काय प्रकार! स्काय डायव्हिंगच्या आधी महिलेने केला मेकअप... व्हिडिओ तुफान व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला स्काय डायव्हिंग करताना दिसत आहे. पण स्काय डायव्हिग करण्याआधीच ही महिला चक्क विमानाच्या दरवाजात उभं राहून ओठांना लिपस्टिक लावताना दिसत आहे.

राजीव कासले | Updated: Sep 21, 2024, 04:47 PM IST
बाईsss काय प्रकार! स्काय डायव्हिंगच्या आधी महिलेने केला मेकअप... व्हिडिओ तुफान व्हायरल title=

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला स्काय डायव्हिंग (Sky Diving) करताना दिसत आहे. पण स्काय डायव्हिग करण्याआधीच ही महिला चक्क विमानाच्या दरवाजात उभं राहून ओठांना लिपस्टिक (Lipstick) लावताना दिसत आहे. काही तरी हटके करत प्रसिद्ध होण्यासाठी लोकं वाट्टेल ते करतात. या तरुणीनेही प्रसिद्धीसाठी वेगळाच मार्ग निवडलाय. या तरुणीचा अंदाज लोकांना चांगलाच आवडला आहे. अनेक लोकांनी या तरुणीचं कौतुक केलंय तर काही युजर्सने 'प्राण जाए पर मेकअप न जाये' अशी प्रतिक्रिया दिलीय.

काय आहे व्हायरल व्हिडिओत?

व्हायरल होण्याऱ्या या व्हिडिओत एक तरुणी विमानातून स्काय डायव्हिंग करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसतंय. स्काय डायव्हिंग करण्यासाठी लागणारी सर्व तयारी तीने केली आहे. पण विमानातून उडी मारण्याआधी तीने केलेल्या एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विमानाच्या दरवाजात हवेत लटकलेल्या अवस्थेत असतानाही ओठांना लिपस्टिक लावताना दिसत आहे. लिपस्टिक लावल्यानंतर तीने कॅमेरासमोर छानसी पोझ दिली आणि त्यानंतर तीने खाली उडील मारली.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @laltihdama या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तरुणीचा हटके अंदाज नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. आतापर्यंत हा व्हडिओ एक मिलिअनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने म्हटलंय लग्नाला जायचं असो कि स्काय डायव्हिंग करायचं असो काही तरुणींसाठी मेकअप महत्त्वाचा आहे. तर एका महिलेने म्हटलं, आमच्या मुलींसाठी मेकअप आधी बाकीची कामं नंतर.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Asia Thapa (@laltihdama)

स्काय डायव्हिंग म्हणजे काय?

आकाशात उडणाऱ्या विमानातून उडी मारणं आणि पॅराशूटच्या मदीतने सुरक्षितपणे जमिनीवर उतरणं याला स्काय डायव्हिंग म्हणतात. स्काय डायव्हिंग हा साहसी प्रकार आहे. दरवर्षी लाखो लोकं स्कायडायव्हिंगचा आनंद लुटतात. पण स्काय डायव्हिंग हा केवळ साहसी प्रकारच नाही तर अनेक जण यात आपलं व्यावसायिक करियअरही करतात. लष्कर, अग्निशमन दल आणि वैद्यकीय क्षेत्रातही स्काय डायव्हर्सची भरती केली जाते. स्काय डायव्हिंग हा प्रकार धोकादायक वाटत असला तरी आतापर्यंत यात अपघाताच्या घटना फारच दुर्मिळ आहेत. कठोर प्रशिक्षक, सुरक्षेच्या यंत्रणा आणि आधुनिक उपकरणांमुळे स्काय डायव्हिंग करताना खबरदारी घेतली जाते.