Viral Video : गैरवर्तन करणाऱ्या तरुणांना तरुणीने घडवली आयुष्यभराची अद्दल, दे दणादण मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

Girl Viral Video : देशात दिवसेंदिवस लहान मुलींनापासून वयस्कर महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतच एकट्या महिलेला पाहून किस करणारी टोळी गजाआड झाली आहे. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांनी महिला वेटरशी गैरवर्तन केली अन् मग...पाहा व्हिडीओ 

नेहा चौधरी | Updated: Apr 4, 2023, 01:21 PM IST
Viral Video : गैरवर्तन करणाऱ्या तरुणांना तरुणीने घडवली आयुष्यभराची अद्दल, दे दणादण मारतानाचा व्हिडीओ व्हायरल  title=
Viral Video girl bravely fights back boys in restaurant who misbehaved with her trending video google trends

Girl Viral Video :  लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेठणीस येतं नाही आहेत. 

त्यामुळे अशा नराधमांपासून तरुणींने स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी त्यांना कराटे आणि बचावासाठी प्रशिक्षण देण्यात येतं आहे. प्रत्येक मुलीला आपला बचाव करता यावा म्हणून हे किती जरुरी आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

ग्राहकांनी महिला वेटरशी गैरवर्तन केली अन् मग...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रेस्टॉरंटमध्ये दोन तरुण ग्राहक तिथे टेबलवर बसले आहे. त्यांची ऑर्डर घेण्यासाठी तिथे महिला वेटर येते तर त्यातील एका तरुणाने तिच्या अंगाला हात लावला. तिने त्याला विरोध केला आणि त्याला बाजूला करते. पण तो तरुण तिला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी तिच्यामधील नारीशक्ती जागी होती आणि ती अॅक्शन मोडमध्ये येते.  

चित्रपटातील दृश्य वाटावं असं हे सगळं चित्र आहे. तरुणी त्या तरुणाचा हात पकडे आणि त्याचा चेहऱ्यावर ठोसा देते. ते पाहून दुसरा तरुणीही तिचाकडे जातो हे पाहून ती त्याचा पोटावर जोरदार लाथ मारते. तो खुर्चीवर जोरदार आपटतो. पुढे तो त्या तरुणीवर परत हमला करतो ती बचाव करण्यासाठी त्याला ठोसा मारते. (Viral Video girl bravely fights back boys in restaurant who misbehaved with her trending video google trends)

तो रागात तिथली एक खुर्ची उचलतो आणि तिच्यावर फेकतो. ही खुर्ची ती तरुणी एका हाताने पकडते आणि त्याला परत लाथ मारते तो दूर जाऊन पडतो. ती तरुणी या दोन तरुणांवर भारी पडते. त्या दोन तरुणांना त्यांचा कृतीबद्दल ती तरुणी दे दे दणादण मारते. ही संपूर्ण घटना रेस्टारंटमधील सीसीटीव्ही कैद झाली आहे. 

आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्विटर अकाऊंट .@harikarotalar वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यूजर्स हा व्हिडीओ म्हणजे खोटा असून एखाद्या चित्रपटाचे शूटिंग असल्याचं बोलत आहे. पण ते काही असो मुलींना अशा मुलांना अद्दल घडविण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलं पाहिजे.