Poisonous Fish : मासे खाऊन एका महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा पती कोमात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृत महिलेने एका स्थानिक मच्छिवाल्याकडून मासे (Fish) विकत घेतले. घरी आल्यानंतर ते स्वच्छ करुन शिजवले. पण खाल्यानंतर अवघ्या काही क्षणात महिलेला अस्वस्थ वाटू लागलं आणि काही सेकंदाताच तिचा तडफडून मृत्यू झाला. महिलेचा पतीने जेवणात ते मासे खाल्ले होते, त्यांची प्रकृतीही नाजूक आहे. त्यांची मुलगी घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. ( Women Dies after Eating Puffer Fish)
काय आहे नेमकी घटना?
मलेशियात (Malaysia) ही धक्कादायक घटना घडली आहे. एका 83 वर्षांच्या महिलेने पफर फिश (Puffer Fish) विकत घेतली. मलेशियात हे मासे प्रसिद्ध आहेत. पण ते चविष्ठ असले तरी ते प्रचंड विषारी असतात. हॉटेलमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार केले जाता. पफर नावाच्या माशात विषारी असा एक पदार्थ असतो. अत्यंत काळजीपूर्वक तो काढावा लागतो.
NYT च्या रिपोर्टनुसार मृत महिलेने स्थानिक दुकानात पफर मासे विकत घेतले होते. पण ते साफ करताना त्या महिलेने तो विषारी पदार्थ काढला नव्हता. खाण्यात तो पदार्थ आल्याने महिलेला सुरुवातीला उल्टा झाल्या, त्याचवेळी तिच्या पतीची प्रकृती बिघडली. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं तर तिच्या पतीवर उपचार सुरु आहेत.
पफर फिशमध्ये कोणता घातक पदार्थ?
अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पफर फिशमध्ये अत्यंत विषारी अशा टॉक्सिन टेट्रोडोटॉक्सिन आणि सैक्सिटॉक्सिन असतं. पफर मासे गरम पाण्यात शिजवल्यामुळे किंवा फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही त्यातील टॉक्सिन नष्ट होत नाही. जापानमध्ये या माशांना मोठी मागणी असते. पण ते प्रशिक्षित शेफकडूनच बनवले जातात.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पफर मासे अत्यंत विषारी असतात. या माशांमध्ये घातक टॉक्सिन असतं जे सायनाइडपेक्षा 1200 पटीने अधिक विषारी असतं. हे मासे जापान, चीन, दक्षिण आफ्रिका, फिलीपाईन्स आणि मेक्सिको या देशांमध्ये जास्त आढळतात. पफर मासे ब्लोफिश नावानेही ओळखलं जातं. हे मासे दिसायला गोल चेंडू सारखे असतात, त्यांच्या त्वचेवर काट्यांचं आवरण असतं.