नवी दिल्ली: विमानाचा प्रवास शांतपणे करतात. तर दुसरीकडे लोकल ट्रेन किंवा एक्स्प्रेसच्या डब्यातून केलेला प्रवास हा खूप वेगळाच असतो. एक्स्प्रेसच्या डब्यात गाण्याच्या भेंड्या, गप्पा गोष्टी, वेगवेगळे बैठी खेळ आणि खूप धमाल करता येते. तसाच अनुभव जर विमान प्रवासात अनुभवता आला तर. नुसती कल्पनाच करून खूप छान वाटतं. पण असं प्रत्यक्षातही घडलं आहे.
विमान प्रवासात चक्क ट्रेनचा अनुभव काही प्रवाशांना घेता आला आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांना बरेच तास प्रवास करायचा असतो. अशावेळी प्रवाशांना कंटाळा आल्यावर गाणी ऐकायला, चित्रपट बघायला किंवा मासिके वाचायला आवडतात, पण
तुम्ही कधी एखादी फ्लाइट पाहिली आहे जसे की लोकल ट्रेनमध्ये लोक गाण्यावर टाळ्या वाजवत आहेत. ही महिला विमानात गाणं म्हणत आहे तिला प्रवासी टाळ्या वाजवून साथ देत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.