ऑफिस पार्टीत जास्त पिण्याची पैज लागली! 2 लाखांसाठी 10 मिनिटात 1 लीटर दारू रिचवली, पण...

ऑफिसच्या पार्टीत सर्वात जास्त दारू कोण पिणार याची  पैज लागली. एका कर्मचाऱ्याने हे चॅलेंज स्विकारत अवघ्या दहा मिनिटात एक लीटर दारू रिचवली, पण हे चॅलेंज त्याला जीवावर बेतलं. याप्रकरणी पोलिसांनी पार्टी आयोजित करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.  

राजीव कासले | Updated: Oct 8, 2023, 09:09 PM IST
ऑफिस पार्टीत जास्त पिण्याची पैज लागली! 2 लाखांसाठी 10 मिनिटात 1 लीटर दारू रिचवली, पण...  title=
प्रतिकात्मक फोटो

Drinking One Liter Liquor in 10 Minutes : मित्रा-मित्रांमध्ये अनेक पैजा लागतात. दारू (Liquor) प्यायल्यावर तर चॅलेंज (Challenge)  स्विकारण्याचं जास्तच बळ येतं. पण काहीवेळा हे धाडस जिवावरही बेततं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने ऑफिसच्या कर्मचाऱ्यांसाठी पार्टी आयोजित केली. पार्टीला ऑफिसमधले अनेक कर्मचारी उपस्थित होते. पार्टी रंगात आली असतानाच त्या व्यक्तीने आपल्या सहकाऱ्यांना चॅलेंज दिलं. सर्वात जास्त दारु कोण पिऊ शकतं, याचं आव्हान त्याने दिलं. इतकंच काय तर यासाठी त्याने दोन लाख रुपये जाहीर केले. पण हे चॅलेंज चांगलच महागात पडलं

नेमकं काय घडल?
एका ऑफिसमधल्या टीम लिडरने आपल्या सहकाऱ्यांसाठी पार्टी आयोजित केली. पार्टी दरम्यान टीम लीडरने आपल्य सहकाऱ्यांना चॅलेंज दिलं. सर्वात जास्त दारु पिणाऱ्या व्यक्तीला दोन लाख रुपये रोख देण्याची घोषणा त्याने केली. हे आव्हान एका कर्मचाऱ्याने स्विकारलं आणि एक लिटर दारू रिचवली. चीनमधली ही घटना आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या बातमीनुसार आव्हान स्विकारलेल्या व्यक्तीचं नाव झांग असं होतं. झांगने अवघ्या 10 मिनिटात एक लीटर दारू ढोसली.  ठरल्याप्रमाणा टीम लीडरने झांगला 20,,000 युआन म्हणजे 2 लाख रुपये रोख दिले. 

झांगची तब्येत बिघडली
झांगने आव्हान पूर्ण केल्याने सर्व सहकारी त्याचं कौतुक करत होते. पण पार्टी सुरु असताना अचानक झांगची तब्येत बिघडली आणि तो जमिनीवर कोळसला. अचानक घडलेल्या या प्रकाराने त्याचे सहकाही घाबरले. त्यांनी झांगला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. दारुचं अतीप्रमाणात सेवन केल्याने झांगला कार्डियाक अरेस्ट आला. त्याबरोबरच त्याचा श्वासही अडकला होता. डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. पण तीन दिवसांनंतर झांगचा मृत्य झाला. 

पोलिसांनी घेतली दखल
झांगच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरु केला. तपासात पोलिसांना ऑफिस पार्टीत पैज लागल्याची माहिती मिळाली. झांगने 10 मिनिटात एक लीटर दारू प्यायल्याचंही तपासात निष्पन्न झालं. झांग जी दारू प्यायला होता, त्याचं नाव बैजिऊ असं होतं. या दारूत 30 ते 60 टक्के इतकं अल्कहोलचं प्रमाण असतं. अल्कहोल मोठ्याप्रमाणात रक्तात गेल्याने झांग कार्डियाक अरेस्ट आला. 

चीनमधली ही पहिलीच घटना नाहीए. चीनमधल्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने लाईव्ह व्हिडिओत 12 तासात 7 बॉटेल बैजिऊ प्यायला होता. त्यानंतर त्याची तब्येत बिधडली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याआधी जून महिन्यात प्रसिद्ध लाइव्हस्ट्रिमरचाही अति मद्यपान केल्याने मृत्यू झाला होता.