...म्हणून अमेरिकेत पाकिस्तानी तरुणांना पीएचडीच्या पदव्या दिल्या जातात- हाफिज सईद

त्यांना सरकारी कार्यालये आणि मंत्रालयांमध्येही सहजपणे वरिष्ठ पद मिळते.

Updated: Oct 12, 2018, 08:01 AM IST
...म्हणून अमेरिकेत पाकिस्तानी तरुणांना पीएचडीच्या पदव्या दिल्या जातात- हाफिज सईद title=

लाहोर: अमेरिका आणि इंग्लंममधील शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून पाकिस्तानी तरुणांची मानसिकता बदलण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरु असल्याचा आरोप लष्कर-ए-तोयबा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने केला आहे. ज्यू आणि ख्रिश्चनांच्या हातातील बाहुले झालेल्या काही पाकिस्तानी प्राध्यापकांच्या माध्यमातून पाश्चात्य जग आपली धोरणे रेटत असल्याचे हाफिजने म्हटले. 

यासाठी परदेशातून शिक्षण घेऊन आलेले पाकिस्तानी राज्यकर्ते जबाबदार आहेत. एखाद्या पाकिस्तानी तरुणाचे इस्लामबद्दलचे विचार बदलल्यानंतर ज्यू प्राध्यापकांकडून त्याला पीएचडीची पदवी दिली जाते. संबंधित तरूण मायदेशात जाऊन आपल्या धोरणांचा प्रसार करेल, ही खात्री पटल्यानंतरच परदेशी प्राध्यापक पाकिस्तानी तरूणांना मोठ्या शैक्षणिक पदव्या देतात. 

पाकिस्तानमध्येही परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या लोकांना मोठी मागणी आहे. त्यांना सरकारी कार्यालये आणि मंत्रालयांमध्येही सहजपणे वरिष्ठ पद मिळते. पज्यू आणि ख्रिश्चनांकडून शिक्षण घेतलेल्या लोकांच्या मदतीने पाकिस्तानमध्ये कल्याणकारी राजवट आणता येणार नाही, अशी टीकाही हाफिज सईद याने केली.